विद्या बाळ यांचा विचार पुढे न्यावा; अभिवादन सभेत विविध मान्यवरांची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

समंजस, विवेकी त्या होत्याच; पण त्यांना प्रत्येक टप्प्यावर टीका, विरोध झाला. तरीही, विद्या बाळ स्रियांना समजून घेत राहिल्या. वेदनेचे भांडवल करून त्या कधी कडवट झाल्या नाहीत. त्यांचा विचार आपण मजबूत करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.
- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

पुणे - समंजस आणि विवेक हा विद्या बाळ यांचा स्थायी भाव होता. त्यांचा विचार सर्वांनी पुढे नेला पाहिजे, अशा भावना व्यक्त करतानाच त्यांच्या नावाने विद्यापीठात अध्यासन सुरू करावे, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘मिळून साऱ्याजणी’च्या संस्थापक संपादक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. बाळ यांना आदरांजली वाहण्यासाठी नारी समता मंच, मिळून साऱ्याजणी, अक्षरस्पर्श ग्रंथालय, सख्या साऱ्याजणी यांनी अभिवादन सभा आयोजित केली होती. त्या वेळी विविध संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. गीताली वि. मं. यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

पुणे : ट्रेझरी पार्क सोसायटीसमोर तरुणावर धारदार शस्त्रांनी वार

डॉ. बाळ यांच्या कन्या विनित बाळ म्हणाल्या, ‘‘आईच्या आणि माझ्या बोलण्यात साम्य आहे. ते केवळ मायलेक म्हणून तर आहेच; पण आम्ही चळवळीतील सहकारीही होतो. ती इच्छामरणाची खंदी पुरस्कर्ती होती. निधनाच्या आधी तिने तिचे म्हणणे रेकॉर्ड करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामध्येही इच्छामरणाविषयी काहीतरी करावे, असा विचार मांडला होता.’’

कात्रज दूध दरवाढ या दिवसापासून येणार अमलात

सुनीती सु. र. म्हणाल्या, ‘‘विद्याताई सर्वांच्या आयुष्यात आल्या आहेत. दोन-तीन पिढ्यांना पाठीवर हात ठेवून सामर्थ्य दिले आहे. आंदोलनांना साथ कशी द्यावी, याचा त्या आदर्श होत्या.’’

श्‍यामला वनारसे म्हणाल्या, ‘‘राजकारणामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढावे, या विचाराने महिला पुढे आल्या. पण, त्या केवळ नावापुरत्याच राहतात. त्यामुळे महिलांचे राजकीय प्रशिक्षण कसे करता येईल, याचा विचार विद्या बाळ करीत होत्या. त्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे त्यांच्या मनात होते. हे केंद्र सुरू करण्यासाठी आता प्रयत्न केले पाहिजेत.’’

सुषमा देशपांडे, मुक्ता मनोहर, सुभाष वारे, बिंदुमाधव खिरे, मनीषा गुप्ते यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्रीती करमरकर यांनी केले. सूत्रसंचालन वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidya Bal meeting of honors