मनाचिये वारी : तंत्रज्ञानातून शोधावे वारीचे नवे रूप

vijay bhatkar.jpg
vijay bhatkar.jpg

Wari 2020 : वारकरी आणि वारी हे आध्यात्मिक परंपरेने तयार झालेले नाते आहे. ते श्रद्धेवर आधारलेले असल्याने निश्‍चितच तकलादू नाही. वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कोणाच्या मनातही आले नसेल की, अशा महामारीमुळे कधीकाळी पायी वारी रद्द करण्याची वेळ येईल. पण, यंदा ते घडले. हे वास्तव स्वीकारण्याची मानसिकता केली पाहिजे. कोरोनामुळे वारकऱ्यांची शारीरिक वारी होणार नाही. मात्र, मानसिक वारी सुरूच असणार आहे. भारतीय संस्कृतीसमोर जेव्हा जेव्हा आव्हाने उभी राहिली, तेव्हा तेव्हा तिने आपले मूळ रूप न बदलता नूतनता स्वीकारली. यंदा वारीचे तसेच झाले आहे.

जीवन जगताना आपण प्रापंचिक, प्रातिभाषिक आणि पारमार्थिक विश्‍वात असतो. मात्र, अडचणीच्या काळात या विश्‍वात एकरूप होता आले पाहिजे. वारीत लाखो वारकरी सहभागी होतात. तेव्हा प्रत्येकाला वारीची वेगळी अनुभूती येते. वारीला जाताना वारकरी भक्तीत एकरूप होतात. पंढरपुरात गेले की कळसाचे दर्शन घेतात. यंदा कोरोनामुळे पायी चालणे घडणार नाही. पण, संतविचारांच्या वाचनाने घरात भक्तीच्या विश्‍वात अखंडपणे राहू शकतो. मोबाईलवरून विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतो. प्रसारमाध्यमांद्वारे पंढरपूरचेही दर्शन होईल. कोरोनामुळे आलेल्या संकटाच्या स्थितीत वारीतील अशी नूतनता यंदा स्वीकारावी लागणार आहे. विठ्ठल आणि वारकरी एकरूप आहेत. त्याच तत्त्वाने तंत्रज्ञानातून वारीचे नवे रूप शोधावे. त्यातील भाव महत्त्वाचा आहे. आधुनिक युगातील तंत्रज्ञान स्वीकारून अध्यात्माची अनुभूती घ्यावी, हाच त्यातल्या त्यात जवळचा मार्ग सध्यातरी दिसत आहे.
(शब्दांकन : शंकर टेमघरे)


""माउलींचा पालखी सोहळा येण्यापूर्वी बरडकरांकडून स्वागताची जय्यत तयारी केली जाते. माउलींच्या आगमनाने गावाला चैतन्य प्राप्त होते. यंदा कोरोनामुळे त्या चैतन्याला आमचा गाव मुकला आहे.''
- शेखर काशीद, बरड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com