सावरकरांवर टीका करण्याचा अधिकार राहुल गांधींना नाही : विक्रम गोखले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

राहुल गांधी यांना सावरकरांबद्दल काय माहीत आहे? त्यांना टीका करण्याचा अधिकारच नाही आणि त्यांच्या टीकेला मी किंमतही देत नाही. सावरकर ब्राह्मण होते म्हणूनच त्यांच्याविरोधात रान पेटविले गेले आहे,'' अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी टीका केली.

पुणे : "मी सावरकरभक्त आहे. संसदेतून सावरकरांचे तैलचित्र काढण्याचा आदेश देणाऱ्या सोनिया गांधी यांनी सावरकर किती वाचले आहेत? राहुल गांधी यांना सावरकरांबद्दल काय माहीत आहे? त्यांना टीका करण्याचा अधिकारच नाही आणि त्यांच्या टीकेला मी किंमतही देत नाही. सावरकर ब्राह्मण होते म्हणूनच त्यांच्याविरोधात रान पेटविले गेले आहे,'' अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी टीका केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल गोखले यांना डिस्टिंग्विश ऍवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल या वेळी उपस्थित होते. शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदी यांची तुलना, देशातील धार्मिकता यांसह अनेक विषयांवर त्यांनी परखड मते व्यक्त केली.

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे उद्या पहिल्यांदाच बारामतीत

ते म्हणाले, "सावरकर यांचे साहित्य मी वाचले आहे. ज्यांना समाजात किंमत नाही, ब्राह्मण, ब्राह्मण्य आणि ब्राह्मणेतर असा वाद पेटता ठेवून त्यांच्या समाजात किंमत मिळवायची आहे, त्यांना कधीच सावरकर समजणार नाहीत. मी अशा लोकांचा विचार करीत नाही. सावरकर हे कुणी देव नव्हते. ते माणूस होते. त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात, हे आपण समजून का घेत नाही? ब्रिटिशांच्या कैदेत खितपत पडण्यापेक्षा बाहेर जाऊन मी पुन्हा माझे काम सुरू ठेवीन, असा विचार करून त्यांनी माफी मागितली होती.''

देशात जे काही चालले आहे ते पाहता आपण सगळेच दहशतवादी आहोत, असे म्हणावे वाटते. जात-धर्म आणखी उपजाती, हे घाण आहे. राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रांत जाती-पातीचे विष पेरले जात आहे.''

शिवाजी महाराज यांच्याशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, जाणता राजाही कुणी होत नसते. ज्यांनी अशी तुलना करावी, त्यांनी बुद्धीचा वापर केला पाहिजे, तोंडाला लगाम घातला पाहिजे, असे स्पष्ट करीत गोखले म्हणाले, ""शरद पवार हे त्यांच्या पक्षातील एकमेव व्हिजनरी नेते आहेत. मला कुणी जाणता राजा म्हणा, असे ते कदापि म्हणणार नाहीत, याची मला खात्री आहे.''

शिवेंद्रराजेंच्या फेसबुकपेजवरील पवारांचा उल्लेख बदलला

सर्व जाती-जमातींना आरक्षण हवे आहे. ब्राह्मणांना का नको? आम्हाला आरक्षण नकोच आहे. आमच्याकडे जी बुद्धी आहे, त्याने आम्हाला जे मिळवायचे आहे ते मिळवू आणि मठ्ठपणा असेल, तर आयुष्यभर भीक मागू, असे त्यांनी नमूद केले.

खासगी सेन्सॉरशिप अमान्य
"वेबसीरिजला सेन्सॉरशिप नाही, याचा ते गैरफायदा घेत आहेत. त्यावर निश्‍चितपणे बंधने आली पाहिजेत. पण, खासगी सेन्सॉरशिप मला मान्य नाही. आम्हाला आधी चित्रपट दाखवा आणि आम्हाला पटला तर प्रदर्शित करा, हे म्हणणे हा गाढवपणा आहे आणि त्याला स्वीकारणे हा मूर्खपणा आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikram Gokhale says Rahul Gandhi has no right to criticize on Savarkar in Pune