esakal | Pune ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

पुणे : ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील शेतकरी, वंचित, सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून, या सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असा आदेश राज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी (ता.७) पुण्यात बोलताना राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला.

ग्रामविकास व पंचायतराज विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे पुण्यात आयोजन केले आहे. या कार्यशाळेचे उदघाटन आज मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते

हेही वाचा: वाघोलीतील वाघेश्वर मंदिर सकाळी सहा वाजल्यापासूनन दर्शनासाठी खुले

श्मुश्रीफ म्हणाले, " प्रत्येक जिल्ह्याच्या विकासात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावांचा सर्वांगिण विकास करण्यावर अधिक भर दिला पाहिजे. यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. विकासाशी संबंधित कृषी, पशूसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, जलसंधारण, छोटे पाटबंधारे आदी महत्वाचे विभाग हे जिल्हा परिषदेशी जोडले गेले आहेत. हे सर्व विभाग ग्रामविकासाशी निगडित आहेत. या विभागातील अडचणी सोडविण्यालशस सिईओंनी प्राधान्य द्यावे."

सध्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. याबाबत राज्याने देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. राज्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून २८ हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. यापैकी ८० टक्के निधी ग्रामपंचायत आणि प्रत्येकी १० टक्के निधी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना मिळणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेत राज्य सरकारने चांगली कामगिरी केली आहे. महाआवास योजनेच्या माध्यमातून सहा लाख घरे ग्रामविकास विभागाने बांधली आहेत. या माध्यमातून सर्वसामान्य, गरिब कुटुंबाचे घराचे स्वप्न पुर्ण झाले आहे.

हेही वाचा: मावळातील अल्पपरिचित लेणी आणि धबधबे

'प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम'चे उदघाटन

राज्यातील जिल्हा परिषदांमधील बांधकामविषयक कामांमध्ये सुसूत्रता यावी, या उद्देशाने प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम विकसित केली आहे. ही सिस्टिम सीडॅकच्या सहकार्याने तयार केली आहे. पहिल्यांदा नाशिक जिल्हा परिषदेत प्रायोगिक तत्वावर या प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे तेथील बांधकाम, लघु पाटबांधारे, ग्रामीण पाणी पुरवठा या विविध विभागातील कामांमध्ये सुसुत्रता येणार आहे. यामुळे कामांची मोजमाप पुस्तिका नोंदविणे, देयके नोंदविणे आदी कामे सुलभ होणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

'ग्रामविकास'च्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण

ग्रामविकास विभागाने नवीन अधिकृत संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर ग्रामविकास विभागाशी सबंधित असणाऱ्या विविध योजनांची माहिती, अध्यादेश, परिपत्रके अपलोड करण्यात येणार आहेत. यामुळे या विभागाशी निगडित नवीन बातम्या, छायाचित्रे, नवीन सूचना, नवीन कार्यक्रम यावर उपलब्ध होणार आहेत.

- पब्लीक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टिमची सुरूवात.

- बालस्नेही व लिंगभाव अनुकुल पंचायत उप्रकमाचे उद्घाटन

- राज्यातील गरिबांसाठीची उर्वरित २ लाख ६२ हजार घरे लवकर पूर्ण करण्याची घोषणा

loading image
go to top