पुण्यातील या गावात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू: तरीही नागरीक विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगविना

जनार्दन दांडगे
Wednesday, 12 August 2020

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. १२) दिवसभरात दोन वयस्कर कोरोना बाधीत रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. वरील दोघांच्या मृत्युमुळे, एकट्या उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील मागिल दहा दिवसातील कोरोनाच्या बळीची संख्या तब्बल पाचवर पोचली आहे.

उरुळी कांचन (पुणे) - उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. १२) दिवसभरात दोन वयस्कर कोरोना बाधीत रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. वरील दोघांच्या मृत्युमुळे, एकट्या उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील मागिल दहा दिवसातील कोरोनाच्या बळीची संख्या तब्बल पाचवर पोचली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तर दुसरीकडे पुर्व हवेलीमधील लोणी काळभोर (११) उरुळी कांचन (५), कदमवाकवस्ती (७), कुंजीरवाडी (२), थेऊर (२), नायगाव (१) या पाच ग्रामपंचायत हद्दीत मागिल चोविस तासात तब्बल २८ कोरोनाचे नवीण रुग्ण आढळुन आले आहेत. तर मागिल तेरा दिवसात पुर्व हवेलीमधील विविध ग्रामपंचायत हद्दीत तब्बल सतरा जनांची कोरोनामुळे मृत्यु झाल्याची धक्कादाय बाब पुढे आली आहे. मागिल चार दिवसात वरील पाच ग्रामपंचायत हद्दीत शंभरहुन अधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले आहेत.  यामुळे पुर्व हवेली कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याचे पुढे आले आहे.

पुण्यात भाजपचे कमळ पूर्ण फुलेना; कार्यकारिणीवर आहे दादा-भाऊंचे वर्चस्व

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुपे वस्ती परीसरातील एक सत्तर वर्षीय रुग्ण बुधवारी सकाळी पुण्यात उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. ही घटना ताजी असतानाच, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या साठ वर्षीय रुग्णाने उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी सात वाजनेच्या सुमारास प्राण सोडला. वरील दोन्ही रुग्णांच्यावर मागिल पंधरा दिवसापासुन उपचार चालु होते. दरम्यान उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तीन रुग्ण मागिल दहा दिवसाच्या कालावधीत मृत्युमुखी पडलेले आहेत. यामुळे एकट्या उरुळी कांचन हद्दीतील कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या पाचवर पोचली आहे. 

पुण्यातील जम्बो हॉस्पिटलचं काम युद्धपातळीवर सुरू; आठवडाभरात रुग्णांच्या सेवेत!

याबाबत अधिक माहिती देतांना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव म्हणाले, लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, थेऊर, नायगाव या पाच ग्रामपंचायत हद्दीत मागिल चोविस तासात तब्बल २८ कोरोनाचे नवीण रुग्ण आढळुन आले आहेत. लोणी काळभोर, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती या तीन ग्रामपंचायत हद्दीत रुग्ण वाढीचा दर मागिल तीन दिवसात मोठ्या प्रमानात वाढला आहे. रुग्ण मोठ्या प्रमानात वाढत असताना, नागरीक मात्र अद्यापही विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगविना फिरत असल्याचे दिसुन येत आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: village Uralikanchan Pune five people died without any civilian masks or social distancing