esakal | 'वीर जवान अमर रहे'; सैनिकांच्या गावात कारगिल शहिदांना वाहिली आदरांजली!
sakal

बोलून बातमी शोधा

Kargil_Martyrs_Pingori

पिंगोरी (ता.पुरंदर) येथे ग्रामस्थांच्यावतीने रविवारी (दि.२६) कारगिल विजयदिन साजरा करण्यात आला. यावेळी 'भारत माता की जय', 'वीर जवान अमर रहे' आदी घोषणा देण्यात आल्या.

'वीर जवान अमर रहे'; सैनिकांच्या गावात कारगिल शहिदांना वाहिली आदरांजली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाल्हे (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव पिंगोरी येथील शहीद शंकर शिंदे आणि रमेश शिंदे यांच्या शदीह स्मारकास पिंगोरी ग्रामस्थ आणि जेजुरी पोलिसांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. कारगिल युद्धामध्ये पिंगोरी गावचे हे दोन सुपूत्र शहीद झाले होते. त्यांचे योगदान हे देशासाठी आणि समाजासाठी अमूल्य असे असून कारगिल विजय दिनी सर्वांनी शहिदांच्या हौत्माम्याचा आदर करावा. आणि त्यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक व्हावे, अशा शब्दांत जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी आदरांजली अर्पण केली.

'कारगिल विजय दिवस' लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्यावतीने साजरा​

पिंगोरी (ता.पुरंदर) येथे ग्रामस्थांच्यावतीने रविवारी (दि.२६) कारगिल विजयदिन साजरा करण्यात आला. यावेळी 'भारत माता की जय', 'वीर जवान अमर रहे' आदी घोषणा देण्यात आल्या. तसेच राष्ट्रगीतही म्हणण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. दरम्यान यावेळी शहिदांच्या शौर्याला उजाळा देऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी माजी सैनिक महादेव गायकवाड, माजी सरपंच पल्लवी भोसले, संदिप कारंडे, धनंजय शिंदे, वसंत शिंदे, राजकुमार शिंदे, भरत निगडे आदि उपस्थित होते.

Kargil Vijay Diwas : बारामतीत कारगीलच्या हुतात्म्यांना आदरांजली​

पुढे बोलताना माने म्हणाले की, आपले सैनिक प्राणपणाने लढून देशाच्या सीमेचे रक्षण करीत असतात. प्रसंगी हसत-हसत मृत्युला कवटाळणाऱ्या या वीरांच्या शौर्याचे मूल्यांकन आपण शब्दात करू शकत नाही. देशासाठी लढणाऱ्या या वीरांच्या स्मृतीला आपण केवळ सलाम करू शकतो. या विजयदिनी 
देशासाठी लढणाऱ्या आणि प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या परिवाराला देखील मी मानाचा, सन्मानाचा सलाम करतो. 

याप्रसंगी भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले नवनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन केले. पोलिस पाटील राहुल शिंदे यांनी प्रास्ताविक केले. माजी सैनिक भरत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश शिंदे यांनी आभार मानले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)