
उरुळी कांचन, ता. १८ : संतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या विद्यमाने 'वननेस वन' प्रकल्पाचा पाचवा टप्पा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने देशभरातील ६०० हून अधिक ठिकाणी मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने आयोजित केला.
पुणे जिल्ह्यामध्ये भवरापूर (ता. हवेली) या ठिकाणी या प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी १००० वृक्ष लावण्यात आले असून त्यांची देखभाल मिशनच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती मिशनचे ताराचंद करमचंदानी यांनी दिली.