मुळशी तालुक्यात पिक विमा कंपनीकडून शेतकरींच्या भेटी व पाहणी

Visits and inspections of farmers from crop insurance company in Mulshi taluka
Visits and inspections of farmers from crop insurance company in Mulshi taluka

भुकूम : मुळशी तालुक्यात अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले होते. शेतकरींना पिक विम्याची रक्कम मिळावी अशी मागणी तालुका शेतकरी संघाने मेळावा घेऊन मागणी केली होती. त्यामुळे कंपनीने प्रतिनिधी पाठवून नुकसान झालेल्या शेतकरींना भेटून खाचरांची पाहणी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अतिवृष्टीमुळे काढणी केलेली रोपे भिजून मोठे नुकसान झाले होते. तसेच रोपे खाचरात व पाण्यात पडली. लोंब्यावर करपा रोग गेला. काही ठिकाणी काढणी रखडली त्यामुळे शेतकरींना भाताचे उत्पन्न मिळाले नाही. विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून तालुका शेतकरी संघाने विमा कंपनी व कृषी आधिकारी यांचा शेतकरी समावेत मेळावा घेतला होता. त्यावेळी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मारणे यांनी विमा कंपनीने तक्रार करण्याच्या जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी केली होती. शेतकरींनी खाचरात जाऊन अँपवर फोटो पाठवावेत हे शक्य नव्हते.

Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​

अँड्राईड सर्व शेतकरींकडे नाही, शेतात नेट मिळत नाही. त्यामुळे कंपनीच्या आघिकारी यांनी भेट देऊन भरपाई द्यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे कंपनीने अर्ज केलेल्या सर्व शेतकरींच्या भेटी घेऊन नुकसान झालेल्या खाचरांची पाहणी केली. तालुक्यात कोळवण खोरे, रिहे खोरे, पौड माले भाग, मुठा खोरेत शेतकरींच्या भेटी घेतल्या. त्यामुळे शेतकरींना पिक विम्याची रक्कम मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 

Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​

(Edited by : Sharayu Kakade)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com