ज्येष्ठांनो काळजी करू नका; कोरोना रोखण्यासाठी तुम्हाला देणार 'हे' औषध!

Vitamin, mineral dose will be be given to 6 lakh senior citizens in the Pune district
Vitamin, mineral dose will be be given to 6 lakh senior citizens in the Pune district

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील वयाची साठी ओलांडलेल्या सुमारे ६ लाख ज्येष्ठांना व्हिटामिन सी, डी आणि मिनरलच्या झिंक सल्फेट गोळ्यांचा डोस दिला जाणार आहे. यानुसार या सर्वांना सलग सहा आठवडे या गोळ्या दिल्या जाणार आहेत. यापैकी व्हिटामिन डीची आठवड्यातून एकदा एक गोळी तर, व्हिटामिन सी आणि मिनरलच्या झिंक सल्फेट या गोळ्यांचा दररोज सकाळ, संध्याकाळ याप्रमाणे सलग सहा आठवडे डोस देण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येत्या आठवड्यापासून हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या गोळ्यांच्या खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून (जिल्हा परिषद स्वनिधी) ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १० मार्चला पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर अगदी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ५० च्या आसपासच होती. परंतु आंतरजिल्ह्यातील नागरिकांनी आपापल्या मूळ गावाकडे येण्यास सुरुवात केल्यानंतर ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सुमारे २०० रुग्ण हे फक्त मुंबई, पुणे रिटर्न असल्याचे आढळून आले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, रुग्णवाढीचा वाढता वेग पाहता, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने आणखी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये कोविड केअर सेंटर व रुग्णालयांची संख्या वाढविणे, अधिकाधिक खाटांची आणि गोळ्या-औषधांची उपलब्धता करून देणे आणि कोरोनापुर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील कोरोना स्थिती

- पुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाग्रत ----  २६६ (नगरपालिका क्षेत्र वगळून).

- आतापर्यंत बरे झालेले रुग्‍ण --- १०८.

- सध्याचे एकूण क्रियाशील रुग्ण --- १५८.

- कोरोनामुळे झालेले मृत्यू  --- ०७.

- पुणे ग्रामीणचा मृत्‍यूदर --- २.९  टक्‍के. 

- ग्रामीण भागातील एकूण कंटेन्मेंट झोनची संख्या --- १०७. 

- सध्या क्रियाशील कंटेन्मेंट झोन --- ७१.

- ग्रामीण भागातील एकूण रुग्णांपैकी मुंबई रिटर्न --- ९६.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना 

- जिल्‍ह्यात तपासणी नाके उभारणी --- १११.

- तपासणी नाक्यावरील कर्मचारी संख्या -- ९१२. 

- संस्थात्मक विलगीकरण संख्या --- ३ हजार ९९०.

- गृह विलगीकरण संख्या ---  ६७ हजार. 

- एकूण कोविड केअर सेंटर (सीसीसी) --- ३३.

- सीसीसीमधील उपलब्‍ध खाटांची संख्‍या --- ३ हजार ८८०. 

- कोविड रुग्‍णालये ---  २१. 

- कोवीड रुग्णालयातील एकूण उपलब्ध खाटा ---  एक हजार १८१. 

फायनल इयरच्या परीक्षे संदर्भात मुख्यमत्र्यांसह झाली बैठक, पण....

संभाव्य प्रतिबंधात्मक उपाययोजना नियोजन 

- आणखी कोविड केअर सेंटरची (सीसीसी) उभारणी --- १७.

- नवीन सीसीसीतील उपलब्ध होणाऱ्या खाटा --- ४ हजार ६८२. 

- नवे  कोविड रुग्‍णालये नियोजन ---- २८.

- कोवीड रुग्णालयातील उपलब्ध होणाऱ्या खाटा ---- १ हजार ८३०.
उर्जामंत्र्यांनी दिला अधिकाऱ्यांना इशारा; अखंडीत वीज पुरवठा करा अन्यथा....

विशेष नियंत्रण कक्ष स्थापन 
दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामस्थांच्या मदतीसाठी  जिल्हा स्तरावर विशेष नियंत्रण कक्ष (स्‍पेशल कंट्रोल रुम) स्‍थापन करण्‍यात आला आहे. या कक्षाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४१३० असा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com