Onion Export : कांदा निर्यात बंदीचा घोळ काय मिटेना आणि शेतकऱ्यांना कांदा परवडेना

सध्या लोकसभेच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहते आहे.निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी उठवणार अगोदर काही प्रमाणात उठवली असे जाहीर झाले मात्र त्यातील घोळ काही संपत नाही असे वास्तव चित्र आहे.
Onion Export
Onion Export sakal

चाकण : सध्या लोकसभेच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहते आहे.निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्च नंतर कांदा निर्यात बंदी उठवणार अगोदर काही प्रमाणात उठवली असे जाहीर झाले मात्र त्यातील घोळ काही संपत नाही असे वास्तव चित्र आहे.राज्यात कांद्याचे भाव वाढून मतांचे नुकसान होऊ नये अशी परिस्थिती केंद्राने जाणून-बुजून ठेवली आहे का, निर्यातीला कोण विरोध करतेय असाही सवाल शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा केंद्राला आहे. निर्यात बंदीचा घोळ काही मिटत नाही त्यामुळे राज्यात कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढण्याऐवजी पुन्हा ते घसरू लागले आहेत. अगदी किमान आठ ते कमाल चौदा रुपये प्रति किलो अशी स्थिती राज्यातील चाकण, नाशिक या मोठ्या बाजारातील आहे.कांद्याचे भाव एका महिन्यात सात रुपयांनी घसरलेले आहेत.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 22 मार्चला एक अधिसूचना काढून 31 मार्च 2024 नंतरही कांदा निर्यात बंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये निर्यात बंदी उठेल व रब्बी हंगामातील कांद्याला तसेच उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु ती आशा आता पूर्णपणे मावळली आहे.परकीय व्यापार विभागाचे महासंचालक यांचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सरंगी यांनी कांदा निर्यात बंदी कायम राहणार असल्याची अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे त्यात म्हटल्याप्रमाणे 7 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली होती.

ती 31 मार्च 2024 पर्यंत राहणार होती मात्र नव्या निर्यात धोरणानुसार पुढील सूचना येईपर्यंत कांदा निर्यात बंदी 31 मार्चनंतर वाढविण्यात आली आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांना,व्यापाऱ्यांना निर्याती संदर्भात केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे व घोळामुळे फार त्रास तसेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे अशी परिस्थिती आहे. केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क कांद्यावर लागू केले होते त्यानंतर राज्यात देशात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले होते.

त्याचा फटका शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना बसला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे,व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. निर्यात शुल्क 40 टक्के आकारल्यामुळे राज्यात तसेच देशात शेतकरी संघटनांनी,शेतकऱ्यांनी, काही विरोधी पक्षांनी विविध ठिकाणी आंदोलने केली. दिवसेंदिवस कांद्याचे भाव वाढण्याऐवजी घसरत असल्यामुळे कांद्याचा एकरी उत्पादन खर्चही वसूल होत नाही. राज्यातील चाकण व नाशिक या महत्त्वाच्या बाजारामध्ये कांद्याला प्रति किलोला घाऊक बाजारात आठ ते 14 रुपये भाव आहे.चाकण येथील महात्मा फुले बाजारात कांद्याची आज ता. 23 ला सुमारे साडेबाजार हजार क्विंटल आवक झाली.कांद्याला घाऊक बाजारात प्रति किलोला आठ ते 14 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या भावात मोठी घसरण होत आहे.ही घसरण शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना चिंता करायला लावणारी आहे.

परकीय विभागाने निर्यात धोरणाबाबत स्पष्टता करावी.निर्यात धोरणामध्ये घोळ निर्माण झाल्यामुळे कांदा निर्यात बंदी होत आहे.त्यामुळे राज्यात देशांतर्गत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे व मागणी कमी आहे त्यामुळे कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत आहे. कांद्याचे भाव कमीत कमी प्रतिकिलोला वीस रुपये असले पाहिजे. कांद्याचे भाव प्रतिकिलोला वीस रुपये असतील तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होतो, परंतु कांद्याचे भाव अगदी आठ ते चौदा रुपया पर्यंत आले तर शेतकऱ्यांनी करायचे काय अशी परिस्थिती आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी नेहमी उठवली पाहिजे.कांदा निर्यातीचे धोरण स्पष्ट केले पाहिजे तरच शेतकऱ्यांना फायदा होईल, नाहीतर शेतकरी उध्वस्त होईल. असे कांद्याचे निर्यातदार प्रशांत गोरे पाटील, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले.

Onion Export
Pune News : पोलिसांना बघताच ड्रग्ज तस्कराचा हृदयविकाराने मृत्यू

कांद्याच्या निर्यात बंदी उठविण्या बाबत घोळ निर्माण झाल्याने चाकण येथील राज्यात महत्त्वाचच्या असलेल्या मोठ्या बाजारात कांदा निर्यातीसाठी कांदा खरेदी करण्यासाठी दिल्ली,उत्तर प्रदेश,मुंबई येथील व्यापारी, निर्यातदार कंपन्या आलेल्या नाहीत. काही कंपन्या, व्यापारी चाकण येथील बाजारातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यातीसाठी खरेदी करतात. त्यामुळे कांद्याचे भाव वाढतात परंतु निर्यात बंदी उठवली नाही निर्यातीबाबत केंद्र सरकार सातत्याने घोळ करत आहे. त्यामुळे कांदा निर्यातदार व्यापारी, कंपन्या बाजारात आल्या नाहीत.कांद्याची आवक वाढलेली आहे व मागणी कमी आहे. कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत आहे. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने, परकीय व्यापार विभागाने कांद्याचे निर्यात धोरण स्पष्ट करावे अशी मागणी खेड बाजारात समितीचे संचालक,व्यापारी माणिक गोरे, महेंद्र गोरे, विक्रम शिंदे यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com