Pune : वारकऱ्यांसाठी दिवे घाटात झेडपीचा आंतररुग्ण कक्ष; वाघमारे

सीईओ वाघमारे यांची माहिती ः पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृहांची सोय
Waghmare ZP inpatient ward at Dive Ghat for warkari facility of drinking water
Waghmare ZP inpatient ward at Dive Ghat for warkari facility of drinking watersakal

पुणे : जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज या दोन्ही पालख्यांसमवेत असलेल्या वारकऱ्यांसाठी पुणे जिल्हा परिषद यंदा पहिल्यांदाच दिवे घाटात खास आंतररुग्ण कक्ष उभारणार आहे. हा अवघड दिवेघाट पार केल्यानंतर वारकऱ्यांना त्रास होण्याची शक्यता गृहित धरून या आंतररुग्ण कक्षाची सुरू करण्यात येत आहे.

यानुसार या घाटमाथ्यावर असलेल्या झेंडेवाडी (ता.पुरंदर) येथे दहा खाटांचा (बेड) कक्ष सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय पालखीतील वारकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह, आरोग्यविषयक सर्व सुविधा आणि विसाव्यासाठी निवाऱ्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंद्रकांत वाघमारे यांनी शुक्रवारी (ता.२) पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके आदी उपस्थित होते.

Waghmare ZP inpatient ward at Dive Ghat for warkari facility of drinking water
10th Result Pune : आंबेगावात 32 माध्यमिक शाळांचा शंभर टक्के निकाल; 2 हजार 918 विद्यार्थी उत्तीर्ण

वाघमारे पुढे म्हणाले, ‘‘पालख्यांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील पालखी मार्गांवरील रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे. ही कामे अंतिम टप्प्यात आली असून काही प्रगतिपथावर आहेत.

यंदा फिरते स्वच्छतागृहांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. पिण्यासाठी टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फिरत्या वैद्यकीय पथकांची स्थापना केली आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून (सेस फंड) टँकरच्या डिझेलसाठी खर्च करण्यात येत असे.

यंदा मात्र यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. दिवे घाटातील आंतररुग्ण कक्षात पिण्यासाठी थंड पाणी, पंखे, कुलर, वैद्यकीय पथके, पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. दरम्यान, सध्या पालखी मार्गावरील दोन्हीही बाजूंच्या गावांचे साथरोग सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच दिंड्यांसाठी एक हजार औषधी किटचे वाटप करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर ३० आरोग्यदूत नियुक्त करण्यात आले आहेत.’’

Waghmare ZP inpatient ward at Dive Ghat for warkari facility of drinking water
Pune Crime : चोरीचे 14 मोबाईल व एक दुचाकी हस्तगत, सात गुन्ह्यांमधील पावणेदोन लाखाचा मुद्देमाल ताब्यात

वारकऱ्यांसाठी झेडपीच्या सुविधा दृष्टीक्षेपात

- दोन्ही पालख्यांसाठी मिळून २ हजार ७०० फिरते स्वच्छतागृह

- परतीच्या मार्गावर चारशे फिरते स्वच्छतागृह असणार

- पिण्याच्या पाण्यासाठी १०६ टॅंकरद्वारे पुरवठा करणार

- दोन किलोमीटर अंतरावर एक वैद्यकीय पथक असणार

- अतिरिक्त आरोग्य पथकांसह १४६ वैद्यकीय पथके कार्यरत राहणार

- दोन्ही पालखी मार्गांवर १४० रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध

- एकूण रुग्णवाहिकांपैकी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीसाठी ५० रुग्णवाहिका

- संत तुकाराम महाराज पालखीसाठी ९० रुग्णवाहिका

- पालख्यांच्या बैलांची आरोग्य तपासणी करणार

- बैलांच्या बैलांच्या आरोग्य तपासणीसाठी पशुवैद्यकीय पथके कार्यरत राहणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com