पुणे : शिवी दिली म्हणून सराईताने केला वेटरचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

- तळजाई पठार खून प्रकरणाचा उलगडा

पुणे : तळजाई टेकडीवर झालेल्या वेटरच्या खूनप्रकरणाचा छडा लावण्यास सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी रेकॉर्डवरील एका गुन्हेगारास अटक केली. वेटरने त्याला शिवीगाळ केल्यावरून रागाच्या भरात त्याच्या चेहऱ्यावर वार करीत त्याचा खून केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दत्तात्रेय बापूराव मिसाळ (वय 28, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) याला अटक केली आहे. रवी सिराज भारती (वय 38, रा. टिहरी गढवाल, उत्तराखंड) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. याप्रकरणी मिसाळ विरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं बैठकीत? ज्यानंतर अजित पवारांनी बंड केलं

धनकवडी परिसरातील तळजाई पठारावर नागरिकांना 30 नोव्हेंबर रोजी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर वार असल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी त्याच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांवरून तो उत्तराखंडचा असून, हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून तपास सुरू केला आणि संशयित आरोपी मिसाळ याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे केलेल्या तपासात मिसाळ याचे भारती याच्यांसोबत वाद झाला होता. त्यातून भारती यांनी त्याला शिवीगाळ केली होती. त्यामुळे रागाच्या भरात वार करून त्यांचा खून केल्याची माहिती मिसाळने पोलिसांना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: waiter murdered by criminal in Pune