स्कॉलरशिप मिळवायची आहे, मग 'इथे' करा रिसर्च!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मदतीसाठी दानशूरांना आवाहन 
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या कामाला समाजातील दानशूर व्यक्तींकडून नेहमीच पाठिंबा मिळत आला आहे. २०१९-२० हे वर्ष फाउंडेशनचे हीरक महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त हुशार, जिद्दी, गरजू व होतकरू विद्यार्थी व शिक्षकांना संशोधनासाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती द्यावी, तसेच अशा १० शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी देण्याचा फाउंडेशनचा मानस आहे. पुढील काळातही समाजाच्या सर्व स्तरांतून ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला मिळणारी आर्थिक मदत वाढत गेली तरच हुशार संशोधकांना ही वाढीव रक्कम देणे शक्‍य होणार आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी हातभार लावावा, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने केले आहे. ही आर्थिक मदत ८० जी या नियमानुसार प्राप्तिकर सवलती खाली येते.

पुणे - संशोधनपर कामासाठी २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’ यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणत्याही क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना दरवर्षी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, जैवतंत्रज्ञान, कुक्कुटपालन, मायक्रोबायोलॉजी, मॉलेक्‍युलर, बायोलॉजी, झुलॉजी, बॉटनी व बायोकेमिस्ट या विषयांमध्ये संशोधन करणाऱ्यांना ‘दामोदर माधव ओक’ आणि ‘सुधा दामोदर ओक’ यांच्या नावाने पाठ्यवृत्ती देण्यात येते. महाविद्यालय, विद्यापीठ आणि संशोधन संस्थांमधील विद्यार्थी व शिक्षकांना यासाठी अर्ज करता येणार आहेत. 

पुण्यातील ‘खडकवासला’ची वीज कधी होणार चालू वाचा

निवड झालेल्या संशोधकांना शिष्यवृत्ती व पाठ्यवृत्ती म्हणून संशोधनाच्या खर्चासाठी प्रत्येकी ४० हजार रुपये दोन समान हप्त्यात दिले जातील. पहिल्या वर्षभरातील संशोधन प्रकल्पाच्या प्रगतीचे तज्ज्ञांकडून अवलोकन झाल्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी तेवढीच रक्कम देण्याचा विचार केला जाणार आहे. शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तीच्या छापील अर्जासाठी इच्छुकांनी विनंती पत्रासोबत दहा रुपयांचे टपाल तिकीट लावलेले व स्वतःचे नाव, पत्ता लिहिलेले पाकीट ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’, प्लॉट क्रमांक २७, नरवीर तानाजी वाडी, पीएमटी डेपोजवळ, साखर संकुलजवळ, शिवाजीनगर, पुणे - ४११००५’ या पत्त्यावर ३१ जानेवारी २०२० पर्यंत पाठवावे. संपूर्ण भरलेले अर्ज १० फेब्रुवारी २०२० पर्यंत स्वीकारण्यात येतील.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी नाट्य स्पर्धा

अर्जाची छाननी व आवश्‍यकतेनुसार इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ शिष्यवृत्तीसाठी दोन आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी दोन अशा चार जणांची यासाठी निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी ०२०-२५६०२१००(३७३) या क्रमांकावर रविवारची सुटी सोडून इतर दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Want to get a scholarship then do research here