Pune - सलग तिसऱ्या दिवशी खूनाची घटना; २१ वर्षीय तरुणाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खूनाची घटना घडली आहे. याआधी सोमवारी कोंढव्यात तर मंगळवारी कात्रज बोगद्याजवळ खूनाच्या घटना समोर आल्या होत्या.

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खूनाची घटना; २१ वर्षीय तरुणाची हत्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वारजे - पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खूनाची घटना घडली आहे. याआधी सोमवारी कोंढव्यात तर मंगळवारी कात्रज बोगद्याजवळ खूनाच्या घटना समोर आल्या होत्या. वारजेतील न्यू अहिरे इथं एका परप्रांतीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. परप्रांतीय तरुण २१ वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे. डोक्यात लोखंडी सळई मारून ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, न्यू अहिरे गावातील २१ वर्षीय परप्रांतीय तरुणाचा त्याच्या मित्रानेच खून केला आहे. दोघेही एकाच खोलीत राहत होते. खूनानंतर पळून जाणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. वारजे माळवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे.

हेही वाचा: चोरांकडून 7 लाखांच्या मोटारसायकली जप्त! सांगोला पोलिसांची कामगिरी

सलग तीन दिवसात पुण्यातील खूनाची ही तिसरी घटना आहे. काल मंगळवारी सकाळी कात्रज बोगद्याजवळ एका तृतीयपंथीयाची हत्या झाल्याचं समोर आलं होतं.सागर उर्फ सारिका उजगरे (वय २३) असे खून झालेल्या तृतीयपंथी याचे नाव आहे. तर सोमवारी कोंढवा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील येवलेवाडी येथे दोघांना काठी आणि बांबूने जोरदार मारहाण करण्यात आली. दोघांना काठीने झालेल्या मारहाणीत ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला होता.

loading image
go to top