Ram Temple : प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषाने दुमदुमला मेंगडेवाडीचा परिसर

आंबेगाव येथे तालुका वारकरी साहित्य परिषद व समस्त ग्रामस्थ गवारीमळा यांच्या वतीने “प्रभू श्रीराम जन्मभूमी श्री क्षेत्र अयोध्या” येथे होणाऱ्या भव्य राम मंदिराच्या कलशारोहण व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणे निमित्त महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार रामायणाचार्य संतोष महाराज बढेकर यांच्या सुश्राव्य वाणीतून आयोजित संगीत तुलसी रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला आहे.
pune
punesakal

पारगाव : गवारीमळा (मेंगडेवाडी) ता. आंबेगाव येथे तालुका वारकरी साहित्य परिषद व समस्त ग्रामस्थ गवारीमळा यांच्या वतीने “प्रभू श्रीराम जन्मभूमी श्री क्षेत्र अयोध्या” येथे होणाऱ्या भव्य राम मंदिराच्या कलशारोहण व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणे निमित्त महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार रामायणाचार्य संतोष महाराज बढेकर यांच्या सुश्राव्य वाणीतून आयोजित संगीत तुलसी रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला आहे.

या कथाप्रसंगी येमाई, शिवरी येथील मठाधिपती स्वामीदास डॉ.गणेशानंद महाराज, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु, व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव संदिप पोखरकर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, सुनिल गवारी, बजरंग देवडे यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, साधुसंत, वारकरी सांप्रदायातील महंत, श्रीराम भक्त, महिला भाविक व हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

pune
Ram Temple Ayodhya Security: ATS कमांडोच्या सुरक्षेखाली अयोध्या! 360 डिग्री सुरक्षा कव्हरेजसाठी अँटी-माइन ड्रोन तैनात

मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या ह्या सोहळ्यात आंबेगाव तालुक्यातील हजारो भाविक सहभागी होत आहेत. भाविकांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्था, भोजनव्यवस्था, पार्किंग व्यवस्था यासाठी गवारी मळा, मेंगडेवाडी येथे प्रशस्त मंडप उभारण्यात आला आहे. अवघे वातावरण राममय होण्यासाठी विविध ठिकाणी बोर्ड, स्वागत कमानी, भगवे झेंडे उभारण्यात आल्याने गवारी मळा, मेंगडेवाडी परिसराला आयोध्या नगरीचे स्वरुप आल्याचे जाणवत आहे. कथेची सांगता सोमवार (दि. २२) रोजी सकाळी काल्याच्या कीर्तनाने होणार असल्याची माहिती कथा सोहळ्याचे आयोजक साईनाथ गवारी व शरद गवारी यांनी दिली.

pune
Ayodhya Ram Temple: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरात जय्यत तयारी; मुंबईतील शिवाजी पार्क दिव्यांनी उजळला

माजी खासदार आढळराव पाटील यांनी “राम नामाचा” जयघोष करत प्रभु श्रीराम व अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले व उपस्थित भाविक भक्तांना आयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. श्री.आढळराव पाटील, देवदत्त निकम व रविंद्र करंजखेले यांच्या हस्ते आरती घेण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन गवारी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com