माऊलीच्या पादुका पंढरीला कशा नेणार? वारकऱ्यांना निर्णयाची प्रतीक्षा

wari 2020 mauli paduka will reach pandharpur by helicopter or bus
wari 2020 mauli paduka will reach pandharpur by helicopter or bus

आळंदी : आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या पादुकां आषाढ शुद्ध दशमीला(ता.३०) आळंदीतून पंढरपूरला निघणार आहेत. मात्र, पादुका हेलिकॉप्टर की बसने न्यायच्या याबाबत राज्य शासनाकडून अद्याप निर्णय आला नसल्याने आळंदी आणि देहू देवस्थान अद्याप निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा जेष्ठ वद्य सप्तमीला (ता.१२) देहूत तर माऊलींच्या पादुक जेष्ठ वद्य अष्टमीला(ता.१३)आळंदीत शासनाच्या आदेशानुसार अत्यल्प वारक-यांच्या उपस्थीतीत प्रस्थान सोहळा पार पडला. त्यानंतर दोन्ही पादुका देहू आळंदीतच ठेवण्यात येवून वारीच्या वाटेवरचे मानाचे किर्तन, जागर, तसेच पूजा असे नैमित्तिक कार्यक्रम करण्यात आले. मात्र, आता पंढरपूरातील आषाढी एकादशी (ता.१) अवघ्या पाच दिवसांवर येवून ठेपल्याने पादुका कशा पद्धतीने न्यायच्या याबाबत दोन्ही देवस्थान प्रतिक्षेत आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्य सरकारकडून हेलिकॉप्टर अथवा बसद्वारे पादुका नेण्याबाबत अगोदर कळविण्यात येईल असे सांगण्यात आले. यामुळे अद्याप शासनाकडून याबाबत कोणताही आदेश सुचना न  आल्याने दोन्ही देवस्थान राज्य सरकारच्या आदेशाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. 

डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार

दिघीतील शिवसेनेचे पदाधिकारी संतोष वाळके यांनी याबाबत हेलिकॉप्टरसाठीचा खर्च करण्याची तयारी असल्याचे पत्र आळंदी देवस्थानला दिले आहे. असाच पत्रव्यवहार आळंदी देवस्थानकडे आणखी काही जणांनी स्वताचे हेलीकॉप्टर देण्याची तसेच भाडेही देण्याची तयारी दर्शविल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले.

पुणे- पेठांमधील एका वॉर्डमध्ये किती पाऊस पडतो, त्याचे अचूक मोजमाप करणे आता शक्‍य​

दरम्यान याबाबत आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅन्ड विकास ढगे यांनी सांगितले की, ''पंढरपूरला जाण्याासाठी राज्य सरकारकडे पन्नास लोकांची परवानगी मागीतली आहे. शासन ज्यांची नावे सांगतील त्यांना सोबत घेवून जावे लागेल.आषाढ शुद्द दशमीला सकाळी अथवा दुपारी जायचे हे सर्वस्वी शासन जाण्यासाठीची व्यवस्था करेल त्यावर अवलंबून असेल. मात्र पंढरीत जाताना परंपरेनुसार आषाढ शुद्द दशमीला वाखरी अथवा इसबावी येथून माउलींच्या पादुका उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातील आणि तेथून पंढरपूरात प्रवेश केला जाईल. मात्र, हे राज्य सरकारने पायी प्रवासाची परवानगी दिली तरच शक्य आहे.एकादशीच्या दिवशी चंद्रभांगा स्नान, प्रदक्षिणा आणि त्रयोदशीला पांडूरंगाची भेट आणि पोर्णिमेला गोपाळकाला करून माउली पुन्हा आळंदीकडे माघारी निघतील. याबाबत अद्याप शासनाच्या परवानगीची प्रतिक्षा आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत शासनाकडून निर्णय येण्याची शक्यता आहे.''
 
किरण राज यादव बारामती नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com