esakal | श्रीपतपिंपरीच्या ओढ्यावरील पुलावरुन वाहतेय पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

pune

श्रीपतपिंपरीच्या ओढ्यावरील पुलावरुन वाहतेय पाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीपतपिंपरी : गावाच्या अलिकडे असणाऱ्या, बार्शी अन् माढा तालुक्याला जोडणाऱ्या ओढ्याच्या पुलावरुन मागील पंधरा दिवसांपासून पाणी वाहत असून ग्रामस्थ,प्रवाशांचे पुलावरील पाण्यातून दळण-वळण सुरु आहे.पुलाला कठडे अथवा अँगलचे गार्ड नसल्याने जीव मुठीत घेऊन सर्वजण जाताना दिसत आहेत पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. तालुक्यातील कुसळंब,बार्शीतील घोर ओढा,कासारवाडी, कोरफळे,अलिपूर,खांडवी येथील लहान मोठ्या ओढ्यातून पाणी श्रीपतपिंपरी येथील ओढ्याला येत असल्याने ओढा वर्षातील आठ महिने वाहत असतो पण पुलावरुन नाही असे येथील नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा: राजू शेट्टींचे नाव वगळले? अजित पवार यांनी दिलं स्पष्ट उत्तर

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित या ओढ्याचे काम झाले असून दोन वर्षापूर्वी डागडूजी करण्यात आली होती पण ओढ्याची उंची मात्र वाढवण्यात आली नाही.तालुक्यात मोठा पाऊस झाला कीं ओढ्यावरुन पाणी वाहणे सूरू होते,31 मे पासून ओढ्यात मुबलक पाणी येत आहे अन् ओढा वाहत आहे. दरम्यान गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी गुरुवारी सकाळी ओढ्याची पाहणी केली,सरपंच रामराजे ताकभाते, बाळराजे पाटील,ग्रामस्थ यांचेशी चर्चा करुन पुलाखालील सहा नळ्या पैकी दोन नळ्यामधून पाणी दगडांमुळे जात नाही तसेच पुलाच्या जवळील शेतात लावण्यात आलेला दगडी बंधाऱ्याचे दगड बाजूला काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान पाणी वाहत असल्यामुळे ओढ्याच्या दोन्ही कडेच्या बाजूला शेवाळे झाले असून चालत अथवा दुचाकी जात असताना घसरुन पडण्याच्या अनेक घटना घडत आहेत तर मागील वर्षी एक जणाचा वाहून जाऊन मृत्यू झाला होता,पुलास सरंक्षक कठडे करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी'सकाळ'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: ...अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा थेट इशारा

पुलाची उंची वाढवण्यासाठी मोठ्या निधीची गरज असून पाऊस थोडा कमी होताच पुलास सरंक्षक लोखंडी अँगलचे गार्ड बसवण्यात येतील तसेच पुलावर खड्डे पडलेले भरुन घेऊन सिमेंटचा थर देऊन रस्ता चांगला करण्याचा प्रयत्न आहे.

-रामराजे ताकभाते, सरपंच, श्रीपतपिंपरी

पुलावरुन पाणी वाहत असून सरपंच व ग्रामस्थांशी गुरुवारी चर्चा केली,पुलाच्या अलिकडील तसेच पुलाखालील नळ्या समोर असलेले मोठे दगड काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी असे सूचवले आहे.

शेखर सावंत, गटविकास अधिकारी,पंचायत समिती बार्शी

loading image
go to top