Pune News : बाणेर येथील रस्त्यावर सांडपाणी ; वाहन चालक हैराण

बाणेर येथे बाणेर महाळुंगे रस्त्यावर गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अनेक नागरिक येथे घसरून पडत आहेत
Pune News
Pune Newssakal

बालेवाडी : बाणेर येथे बाणेर महाळुंगे रस्त्यावर गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अनेक नागरिक येथे घसरून पडत आहेत .तरी प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

बाणेर येथे बाणेर गावाजवळील प्राची रेसिडेन्सी आणि रोहित रेसिडेन्सी जवळच सांडपाणी वाहिनी फुटून गेल्या महिन्याभरा पासून मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे .हा रस्ता अतिशय रहदारीचा असून, सद्या इथे मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याचे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना येथे सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिथून जागा मिळेल तिकडून दुचाकी स्वार वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करणात.

महिनाभरापासून वाहणाऱ्या या सांड पाण्यामुळे येथे रस्ता निसरडा झाला आहे.अनेक नागरिक येथे घसरुन पडत आहेत . तसेच या ठिकाणाहून ये-जा करत असताना नागरिकांच्या अंगावर हे खराब पाणी उडत आहे, परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे .तरी प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

येथे रस्त्याचे काम करत असताना चेंबर मध्ये राडारोडा गेला होता, त्यामुळे चेंबर जवळील ही सांडपाणी वाहिनी फुटली आहे.आजच हे काम सुरू करणार असून, नवीन सांडपाणी वाहिनी टाकणार आहोत , तीन दिवसात हे काम पुर्ण होईल .

गिरीश दापकेकर,सहाय्यक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय

Pune News
Pune News : मेट्रो इको पार्क खुले करण्यासाठी घेराव; झाडे वाचविण्यासाठी कृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक

गेल्या महिन्या भरापासून सतत हे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. रोज तीन चार दुचाकीस्वार इथे घसरून पडत आहेत. येता जाता अंगावर हे पाणी उडत आहे.तरी प्रशासनाने लवकरात लवकर हे काम पुर्ण कराव.

संगीता शिंदे. (बाणेर व्यावसायीक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com