तलावाच्या खोलीकणामुळे सुटणार पाणीप्रश्न

तलावाच्या खोलीकणामुळे सुटणार पाणीप्रश्न
Published on

फुलवडे, ता. १४ : फुलवडे (ता. आंबेगाव) येथील बरकीदरामधील पाझर तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्यात आले. यामुळे पाणीसाठा वाढणार असून, पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत हा साठा पुरणार आहे. पाणीप्रश्न सुटल्याने लाभार्थी शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

खोलीकरण सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ रिलीफ फंड’, नाम फाउंडेशन व न्युमन ॲंड ईस्सार इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भोसरी तसेच ग्रामपंचायत निधी यांच्या संयुक्त सहकार्याने पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच बबन मोहरे यांनी दिली. कामाचा प्रारंभ मंगळवारी (ता. १४ एप्रिल) केला तर शुक्रवारी (ता. ८) काम पूर्ण करण्यात आले. या कामासाठी नाम फाउंडेशनकडून पोकलेन व दोन मशिन ऑपरेटर मोफत देण्यात आले होते. निघालेले दगड, माती शेतकऱ्यांनी स्वखर्चाने टॅक्टर लावून वाहून नेले.
खोलीकरणामुळे बांबळे वस्ती, भारमळ वस्ती, उघडेवाडी, बरकीदरा, हिलेवाडी, मोहरेवाडी या भागातील सुमारे ९५ शेतकरी कुटुंबांना पाण्याचा लाभ मिळणार आहे. पाणीसाठा वाढणार असल्याने पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत पाणी पुरेल इतका साठा उपलब्ध होईल. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्याबद्दल सकाळ रिलीफ फंड व इतर संस्थांचे आभार व्यक्त केले.


05148

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com