लोहगाव परिसरात गेल्या बारा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

लोहगाव परिसरातील पवारवाडी, माळवाडी, वाघमारे वस्ती, काळभोर वस्ती या भागात गेल्या बारा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे.
water supply
water supplySakal
Summary

लोहगाव परिसरातील पवारवाडी, माळवाडी, वाघमारे वस्ती, काळभोर वस्ती या भागात गेल्या बारा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे.

विश्रांतवाडी - लोहगाव परिसरातील पवारवाडी, माळवाडी, वाघमारे वस्ती, काळभोर वस्ती या भागात गेल्या बारा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत. लवकरच लोहगावची यात्रा येत आहे. त्यामुळे दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर शिवसेनेच्या वतीने लोहगाव पंप हाऊसला कुलूप लावण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे वडगाव शेरी मतदार संघाचे विभाग संघटक अमोल पवार यांनी निवेदनाद्वारे बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाला दिला आहे.

यासंदर्भात येथील रहिवासी अमोल पवार म्हणाले की या भागात तीन-चार दिवसांतून एकदा पाणी येते. पण या वेळी गेले बारा दिवस पाणी आलेले नाही. त्यामुळे नागरिकांचे फार हाल होत आहेत. दूरवरून पाणी विकत आणावे लागते. लवकरच लोहगावची यात्रा येत आहे. त्यामुळे पाहुणे येणार, साफसफाई करायची असल्यामुळे पाणी जास्त लागेल. त्यामुळे लवकरात लवकर पाणीपुरवठा व्हावा.

water supply
तीन दिवसांपासून खडकवासला गावात काळोख; बिल थकल्याने महावितरणने मीटर नेले काढून

या परिसरातील दुसरे रहिवासी श्रेयस काकडे म्हणाले की पाणी नसेल तर अनेक अडचणी असतात. त्यामुळे बाकीची सर्व कामे बाजूला ठेवून पाण्यासाठी वणवण करीत फिरावे लागते. परीक्षेचे दिवस आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते. परिसरातील समस्त महिला वर्ग हवालदिल झाला आहे.

बंडगार्डन पाणी पुरवठा अधिकारी शाखाअभियंता सुधीर आलुरकर म्हणाले की व्हॉल्व्हवरून मालाचा ट्रक गेल्यामुळे चौकातील जलवाहिनी व व्हॉल्व्ह तुटला होता. त्यामुळे पाणीपुरवठा बंद होता. आता दुरुस्ती चालू आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com