esakal | दौंड : रावणगाव-मळद गावांच्या शिवेवर खडकवासला कालवा फुटला
sakal

बोलून बातमी शोधा

khadakwasla canal

दौंड : रावणगाव-मळद गावांच्या शिवेवर खडकवासला कालवा फुटला

sakal_logo
By
सावता नवले

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील रावणगाव - मळद गावांच्या शिवेवर आज ( ता. 26 ) सकाळी नऊच्या सुमारास मुख्य खडकवासला कालवा फुटल्याने मोठयाप्रमणात पाण्याच्या अपव्यय झाला. फुटलेले पाणी ओढयाद्वारे दहा किलो मिटरवरील खडकी गावापर्यंत पोचले. साडेचार तासांच्या प्रयत्नानंतर पाटबंधारे विभागाच्या यांत्रिक विभागाला कालवा बुजविण्यात काही प्रमाणात यश आले.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील 442 ग्रामपंचायती कोरोनामुक्त

खडकवासला कालव्याच्या भराव्याला अनेक वर्ष झाली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी भरावा कमजोर झाला आहे. कालव्याचे आतील बाजूने सिमेंट काँक्रिटच्या अस्तरीकरणाला मोठमोठी भगदाडे पडली असून त्यामध्ये काटेरी झुडपे व झाडे वाढली आहेत. त्यामुळे पाण्याची गळती मोठयाप्रमाणात होत असून अनेक वेळा कालवा फुटण्याचे प्रकार घडून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. तरी पाटबंधारे विभागाकडून कालवा दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५३७४ जणांना डिस्चार्ज तर ६४१ नवीन रुग्ण

बुधवारी ( ता. 26 ) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रावणगाव - मळद गावच्या शिवेवर मुख्य खडकवासला कालव्याचा भरावा फुटला. याबाबत संबंधितांना उशिरा माहिती मिळाली. त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या यांत्रिक विभागाचे मशनरी येण्यास वेळ लागला. मशनरी आल्यानंतर दुपारी दीड वाजेपर्यंत फुटलेला कालवा बुजविण्यात काही प्रमाणात यश आले. मात्र फुटलेला कालवा बुजवेपर्य॔त लाखो लिटर पाणी वाया गेले. फुटलेले पाणी ओढयाद्वारे दहा किलो मिटरपर्य॔त गेले असून या दरम्यानचे ओढयावरील बंधारे भरले असल्याची माहिती रावणगाव, खडकी येथील शेतकऱ्यांनी दिली. सुदैवाने कालवा पाणी वाहून जाऊ शकते अशा ठिकाणी फुटल्याने बाजूच्या शेतकर्‍यांची जमिन वाहू जाण्याचा धोका टळला. अन्यथा शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असते. घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील व दौंड विभागाचे उपअभियंता सुहास साळुंके यांनी भेट देऊन फुटलेल्या कालव्याची दुरूस्ती घेतली. कालव्याची अनेक दिवसांपासून दुरूस्ती न झाल्याने सदर ठिकाणी भरावा कमजोर होऊ घळ पडल्याने कालवा फुटण्याचे घटना घडली. मशनरी आल्यानंतर दोन तासात कालवा दुरूस्ती करून पाण्याची गळती बंद करण्यात आल्याची माहिती उपअभियंता साळुंके यांनी दिली.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील 442 ग्रामपंचायती कोरोनामुक्त