आम्हाला हवी नोकरीची हमी! करारावर काम करणाऱ्या आरोग्य सेवकांची मागणी

कोरोनाच्या लाटेत महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या आरोग्य सेवकांना हवी नोकरीची हमी
Health Worker
Health WorkerSakal

पुणे - कोरोनाच्या (Corona) पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या आरोग्य विभागातील (Municipal Health Department) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आरोग्य सेवकांना (Health Worker) नोकरीची हमी (Job Guarantee) हवी आहे. तीन महिन्यांच्या कराराऐवजी ११ महिन्यांचा करार (Agreement) करावा, तसेच कोरोनामध्ये काम करत असल्याने आरोग्य सुविधाही मिळाव्यात, अशी मागणी (Demand) या सेवकांकडून केली जात आहे. (We Need a Job Guarantee Pune Municipal Demand for Contract Health Workers)

कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेच्या आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला. या काळात डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले. त्यामध्ये एकवट मानधनावर तीन महिन्यांसाठी सुमारे अकराशे पदांची भरती काढण्यात आली. त्यामध्ये नर्स, आया, आरोग्य निरीक्षक, दवाखाना सहाय्यक या पदांसाठी महिना १६ ते २२ हजार रुपयांचे मानधन निश्‍चित करण्यात आले. या भरतीमध्ये सलग ४५ दिवस काम केल्यानंतर सेवेत एक दिवसाचा खंड दिला जातो. पुन्हा त्यांना ४५ दिवस कामावर घेतले जाते. गेल्या वर्षभरापासून हे कर्मचारी अशा प्रकारे काम करत आहेत. सध्या सुमारे २०० जण महापालिकेच्या विविध दवाखान्यांसह लसीकरण केंद्रांवर कार्यरत आहेत.

Health Worker
पुण्यात भरदिवसा गोळीबार; पळ काढल्याने वाचला जीव

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत हे एकवट मानधनावर काम करणारे कर्मचारी कायम सेवेत असलेल्या कामगारांसोबत ८ तासांपेक्षा जास्त काम करत आहेत. रुग्णालयातील ऑक्सिजनची व्यवस्था पाहणे, लशीचे वाटप करणे, लसीकरण केंद्रावर नियोजनात मदत करणे अशी कामे करत आहेत. तर सुमारे ७० नर्स वेगवेगळ्या रुग्णालयांत कार्यरत आहेत. यातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे; पण महापालिकेच्या कोणत्याही योजनेतून त्यांना उपचाराचा खर्च मिळत नाही किंवा विम्याचे संरक्षण नाही.

करारात बदल करण्याची मागणी

गेल्या वर्षभरापासून आम्ही आरोग्य विभागात काम करत आहोत. केंद्र सरकारने सलग १०० दिवस ज्यांनी कोरोना काळात काम केले, त्यांच्यासाठी योजना जाहीर केल्या आहेत; पण महापालिका एकवट मानधनावर तीन महिन्यांसाठी घेत आहे. त्यातही ४५ दिवसानंतर एक दिवस सेवा खंडित करून पुन्हा सेवेत घेत आहे. यामुळे आम्हाला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. याचा महापालिकेने विचार करून करारात बदल करावा, अशी मागणी एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘सकाळ’शी बोलताना केली.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना उपचाराचा खर्च तसेच इतर सुविधा आहेत. आम्ही देखील रुग्णालयात काम करतो. अशा प्रकारे आम्हाला मदत केल्यास काम करण्यासाठी नक्कीच आत्मविश्‍वास वाढेल. सध्या तीन महिन्यांचाच करार असल्याने बेकार होण्याची टांगती तलवार आहे.

- परिचारिका

पालिकेने कर्मचाऱ्यांशी करार करताना ज्या तरतुदी केल्या आहेत, त्याचप्रमाणे त्यांना सुविधा दिल्या जातील. त्यापेक्षा जास्त काही देऊ शकत नाही. कर्मचाऱ्यांना अडचणी असतील तर त्यांनी येऊन चर्चा करावी.

- डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com