पुण्यात पाऊस पडल्यानंतर पुढे काय? हवामान खातं म्हणतंय...!

weather department has forecast cloudy weather in Pune city and its environs for four to five days
weather department has forecast cloudy weather in Pune city and its environs for four to five days
Updated on

पुणे : शहर आणि परिसरात शुक्रवारी (ता.१५) सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची स्थिती होती. परंतु वाऱ्यांचा वेग हा कमी होता. त्यामुळे शहरात उकाडा जाणवत होता. येत्या चार ते पाच दिवसात शहर आणि परिसात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये काल जोरदार पाऊस पडला. तर उर्वरित ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान शुक्रवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाला. पण यावेळी वाऱ्यांचा वेग कमी असल्याने उकाडा जाणवत होता. मात्र आज शहरात पाऊसाची शक्यता कमी असल्याची माहिती हवामान विभागातील हवामान शास्त्रज्ञ अनुपम काश्यपी यांनी दिली. 

साखर उद्योगांसाठी सरसावले शरद पवार; पंतप्रधान मोदींना लिहले पत्र

तसेच शनिवारी (ता.15) सुद्धा शहराचे हवामान ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर शहरात पुढील तीन चार दिवस केवळ दुपार नंतर ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे असेही त्यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढील चार दिवसांपर्यंत राज्यातील कमाल तापमान सरासरीच्या आसपास राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस तर मराठवाड्यासह विदर्भात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वारे वाहतील. वाऱ्यांचा वेग 25 ते 30 किलोमीटर प्रतितास इतका असू शकतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी येत्या चार दिवसांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच, कोकण-गोवा येथील तुरळक भागांमध्ये पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता. गेल्या 24 तासांमध्ये संपूर्ण राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदले गेले.

मराठवडपासून ते दक्षिण मध्य कर्नाटकात न्यूनतम वाऱ्यांमुळे पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाले असून ते पुढील काही दिवस राज्याच्या दक्षिण भागात असेच राहणार आहेत. त्यामुळे राज्यातील तुरळक भागांमध्ये तीन चार दिवस मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे. 

- अनुपम काश्यपी, हवामानशास्त्रज्ञ - भारतीय हवामान विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com