Pune Rains : लग्न होण्याआधीच नववधू अन् वराचा संसार गेला पुरात वाहून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

घरात सतरा पिढ्याचे दारिद्र, वडील वॉचमन, आई मोलमजुरी करून आपल्या घराचा कसाबसा संसार चालवणारी त्यांना दोन मुली. दोन मुलीपैकी एका मुलीचे लग्न महिन्यावर आलेलं आणि दुसऱ्या मुलीचं लग्न होऊन घटस्फोटित झालेली अशा चारी बाजूंनी सापडलेल्या घराला पुराने मोठा तडाखा दिला आहे.

स्वारगेट : घरात सतरा पिढ्याचे दारिद्र, वडील वॉचमन, आई मोलमजुरी करून आपल्या घराचा कसाबसा संसार चालवणारी त्यांना दोन मुली. दोन मुलीपैकी एका मुलीचे लग्न महिन्यावर आलेलं आणि दुसऱ्या मुलीचं लग्न होऊन घटस्फोटित झालेली अशा चारी बाजूंनी सापडलेल्या घराला पुराने मोठा तडाखा दिला आहे.

स्माशानात राहणाऱ्या माऊलीचं कुटुंब उध्वस्त

ज्योती जाधव असे त्या नववधूचे नाव आहे तिचं लग्न जमुन दोन महिने झाले होते व येणाऱ्या महिन्यात लग्नाची तारीखही ठरणार होती त्यासाठी आई-वडिलांनी आयुष्यभर केलेले मोलमजूरी साठवून आपल्या लाडक्या मुलीसाठी ग्रॅम ग्रॅमने सोने साठवून चार ते पाच तोळे जमा केले होते. त्याचबरोबर लग्नासाठी लागणारा बस्ताही गेली कित्येक महिने कुटुंब गोळा करत होते, त्याचबरोबर लग्न सोहळ्यासाठी अनेक छोटमोठ्या साहित्याची खरेदी केली होती. हे सर्व पुरात वाहून गेले.

'निघून जा' म्हणत चंद्रकांत पाटलांवर पूरग्रस्तांचा रोष

विशेष म्हणजे ज्यांच्याशी लग्न करून संसार थाटनार होती, ते म्हणजे हेमंत माने यांचे घरही शेजारीच असल्याने त्यांचाही घरातील सर्व वाहून गेले आहे. त्यांचंही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. नियतीने एका क्षणार्धात होत्याचे नव्हते केलं. ज्योती ही घोडेवाला कॉलनी अरण्येश्वर येथे ओढ्याच्या काठच्या झोपडपट्टी मध्ये भाड्याने राहते. ती मूळची कर्नाटकातील जयपूर मधील आहे. हे कुटुंब 2001 साली आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पुण्यात आले होते. कुटुंबाशी संवाद साधला असता आम्हाला उभारण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: before wedding useful material waste in Pune rains