विकेंड लॉकडाऊन; लोणीकाळभोर पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

weekend lockdown loni kalbhor
weekend lockdown loni kalbhor

लोणी काळभोर (पुणे ) - उरुळी कांचन लोणी काळभोरसह पूर्व हवेलीत मेडिकल वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद करण्यात आली आहेत. पूर्व हवेलीतील व्यापारी व दुकानदारांनी जनता कर्फ्यूला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लोणी काळभोर पोलीस विनाकारण फिरणारांची कसून चौकशी करत असून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. शनिवारी  (ता. १०) अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, दवाखाने सुरू होते तर दुध डेअरीची दुकाने सकाळी सहा ते आकरा वाजेपर्यंत सुरू करण्यात आली आहेत. त्यानंतर कोणी दुकान उघडले तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलीस प्रशासनाकडून विकेंड लॉकडाऊन कडक करण्यात येत आहे. 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी नागरिकांना अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे सांगितले आहे. घराबाहेर पडताना कामाबाबतची आवश्यक ती कागदपत्रे जवळ नसल्यास संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अन्यथा पोलीस आपल्या स्टाईलने कारवाई करण्यास समर्थ आहेत असा इशारा ही यावेळी मोकाशी यांनी दिला आहे. 

शुक्रवारी (ता.०९ ) संध्याकाळी सहावाजल्यापासून ते  सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत रिक्षा, बस, टॅक्सी, खाजगी वाहने व सार्वजनिक वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या काळात ॲम्बुलन्स शिवाय एकही वाहन रस्त्यावर येणार नाही. याची पोलिस यंत्रणा काळजी घेणार आहे. या काळात कोणी गरज नसताना वाहने रस्त्यावर आणल्यास संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे मोकाशी यांनी स्पष्ट केले आहे.

लोणी काळभोर येथील नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, दोन दिवसांच्या जनता कर्फ्यू ला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे. कोरोना रोगाची साखळी तोडायची असेल तर घरात बसूनच लोणी काळभोर ग्रामपंचायती, आरोग्य विभागाचे कर्मचारी व लोणी काळभोर  पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे. 
ज्योती अमित काळभोर, उपसरपंच लोणी काळभोर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com