पुणे महापालिकेने कोणता मोठा निर्णय घेतला कर्मचाऱ्यांसाठी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

पुनर्विकासाबाबत फक्त चर्चाच
महापालिकेच्या वसाहती खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून विकसित करण्याची योजना फसल्यानंतर या मिळकतींचा महापालिकेनेच पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यावरही कार्यवाही न झाल्याने २००६ पासून जवळपास दीड ते दोन हजार लोक असुरक्षित इमारतीत राहत असल्याबाबत सभागृह नेते धीरज घाटे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.

पुणे - जुन्या वसाहतीत राहणाऱ्या महापालिका सेवकांना नवी घरे मिळणार आहेत. सेवक आणि प्रकल्पग्रस्तांसाठी पंतप्रधान आवास योजनेसारखा प्रकल्प उभारण्याचे महापालिकेने निश्‍चित केले आहे. त्याअंतर्गत जुन्या वसाहतींचा पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला असून, पहिल्या टप्प्यात धोकादायक झालेल्या दहा वसाहतींच्या जागेत नव्या इमारती उभारल्या जाण्याची शक्‍यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या सेवक आणि प्रकल्पग्रस्तांसाठी शहराच्या विविध भागांतील महापालिकेच्या २६ वसाहती असून, त्या साधारपणे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या  आहेत. परिणामी, त्यापैकी १० वसाहती धोकादायक झाल्याने या इमारतींमधील घरांत राहणे असुरक्षित असल्याचे पाहणीतून आढळून आले आहे.

तरीही, या घरांत लोक राहत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी या वसाहतीचा पुनर्विकास रखडला आहे. या पार्श्‍वभूमीवर सेवकांना हक्काची घरे देण्यासाठी महापालिकेने नवे पाऊल उचलले असून, स्वस्तातील घरांच्या योजनेत त्यांना सामावून घेण्यात येईल.

पुण्याहून हैदराबाद, बेंगळुरूसह प्रयागराजसाठीही रोज फ्लाइट्स

त्यासाठी या इमारती पाडून नवी घरे उभारण्याचा प्रयत्न महापालिका करीत आहे. अशा मिळकतींचा पुनर्विकास केल्यास मोठ्या प्रमाणात घरे निर्माण होतील आणि त्यामुळे या योजनांना गती देऊ, असे महापालिकेचे नवे आयुक्त शेखर गायकवाड यांनी अर्थसंकल्पादरम्यान सोमवारी जाहीर केले. त्यानुसार पुढील आठवड्यात बैठक घेऊन सेवकांना त्यांच्या मागणीच्या प्रमाणात घरे देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याचे सभागृहनेते धीरज घाटे यांनी सांगितले.

महापालिका सेवकांच्या घरांचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्वस्तातील घरांच्या धर्तीवर प्रकल्प उभारणीचा प्रयत्न आहे. त्यासाठी सध्याच्या वसाहतींची जागा पुरेशी आहे, असे घाटे यांनी सांगितले.

महापालिकेच्या वसाहतीतील रहिवाशांना विशेषतः सेवकांना नवी घरे दिल्यास जुन्या वसाहतींच्या जागेत नवी घरे बांधता येतील. त्यामुळे घरांची संख्या वाढणार आहे. सेवकांसह अन्य घटकांनाही सामावून घेणे शक्‍य होणार आहे. 
- शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What a big decision Pune Municipal Corporation made for employees

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: