राज्यातील आगामी निवडणुकांबाबत सरकारची भूमिका काय? अजितदादा म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar
राज्यातील आगामी निवडणुकांबाबत सरकारची भूमिका काय? अजितदादा म्हणाले...

राज्यातील आगामी निवडणुकांबाबत सरकारची भूमिका काय? अजितदादा म्हणाले...

पुणे : राज्यातील आगामी निवडणुकांबाबत निवडणूक आयोगानं निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवारांनी ही अपेक्षा व्यक्त केली. (What role of govt for upcoming elections of Maharashtra Ajit Pawar says)

हेही वाचा: राज्यात आज 18,466 नव्या कोरोना बाधितांची नोंद; 20 जणांचा मृत्यू

पवार म्हणाले, "निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. आम्ही अधिवेशनाच्या काळात यासंदर्भात दोन्ही सभागृहामध्ये एकमतानं ठराव केला होता, तो निवडणूक आयोगाला पाठवला आहे. त्यानंतर राज्यातील परिस्थिती एकदम बदलली आहे. कारण अधिवेशन संपलं २७ तारखेला त्यानंतर बरेच मंत्री, आमदार मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह झाले. तुमच्या आमच्या घरातीलही अनेक लोक सध्या पॉझिटिव्ह झाले आहेत. ही सगळीपरिस्थती पाहता आता निवडणूक आयोगानं याबाबत निर्णय घ्यायचा आहे. राज्यातील संसर्ग निवडणूक आयोगानं गांभीर्यानं घेण्याची गरज आहे"

हेही वाचा: ओमिक्रॉनचं संकट: पुण्यात लॉकडाऊन? अजितदादांनी दिलं उत्तर

दरम्यान, राज्यातील मंदिरं बंद करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित दादा म्हणाले, "जे निर्णय इथं घेण्यासारखे होते ते मी जाहीर केले आहेत. यानंतर जे निर्णय राज्य शासनानं मुंबईत बसून घेणं अपेक्षित आहे, ते त्याच ठिकाणी घेतले जातील. यासाठी उद्या सकाळी नऊ वाजता मंत्रीमंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आम्ही निर्बंधांबाबत ठरवू त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ, त्यानंतर मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय देतील नंतर आम्ही तो प्रसिद्ध करु, असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
loading image
go to top