esakal | ऑक्सिजनची गळती झाल्यास काय करावे? कशी घ्यावी काळजी?

बोलून बातमी शोधा

nashik oxygen gas leakage

गळणाऱ्या ऑक्सिजनच्या आजूबाजूला कोणी बिडी, सिगारेट ओढत असेल अथवा उदबत्ती पेटवलेली असेल तर आग लागू शकते. अशावेळी आग ही पाण्याने विझवायची नसते तर त्याला लाल नळकांड्यात असलेली ड्राय केमिकल पावडर वापरायची असते.

ऑक्सिजनची गळती झाल्यास काय करावे? कशी घ्यावी काळजी?
sakal_logo
By
टीम सकाळ

पुणे : नाशिकमधील ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांना प्राण गमवावा लागला. ऑक्सजनची गळती होऊन, आग लागल्यास ती पाण्याने विझवायची नसते. तर ड्राय केमिकल पावडरचा उपयोग करायचा असतो, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे यांनी दिली.

रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णांना वाढत्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज पडल्याने राज्य सरकारची धावपळ सुरु आहे. त्यामुळे जिथे जिथे ऑक्सिजन बनवला जातो. त्यांच्याकडून तो मिळवण्याचे प्रयत्न चालू आहे. अशा वेळी टॅंकरवर प्रशिक्षित कामगार हवेत. कारण टॅंकरला असलेल्या सांध्यात कुठेही गळती होऊ शकते. अशावेळी असे सांधे परत आवळून घेणे महत्त्वाचे असते. क्वचित प्रसंगी टॅंकरला भोक पडू शकते आणि मग मात्र ती गळती थांबवणे कौशल्याचे काम असते.

हेही वाचा: ऑक्सिजनवरील रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी दमछाक; वीजपुरवठा सहा तास बंद

हेही वाचा: इथे परिस्थिती काय आहे, नेत्यांचं चाललंय काय? लसीकरणासाठी 'दादागिरी'

कोणतीही आग लागायला ऑक्सिजन, ठिणगी आणि ज्वलनशील पदार्थ अशा तीन गोष्टी एकत्रित याव्या लागतात. एरवी हवेतील २१ टक्के ऑक्सिजनही यासाठी पुरेसा असतो. हवेतील ऑक्सिजनमध्ये ७८ टक्के नायट्रोजन असतो. पण टॅंकररमधून गळणारा ऑक्सिजन हा १०० टक्के ऑक्सिजन असतो. तरीही तो गळून हवेत पसरू लागतो, तेव्हा १०० टक्क्यांचे विरळीकरण होऊ लागते.

गळणाऱ्या ऑक्सिजनच्या आजूबाजूला कोणी बिडी, सिगारेट ओढत असेल अथवा उदबत्ती पेटवलेली असेल तर आग लागू शकते. अशावेळी आग ही पाण्याने विझवायची नसते तर त्याला लाल नळकांड्यात असलेली ड्राय केमिकल पावडर वापरायची असते. लोकांनीही अशा गळक्या टॅंकरपासून दूर उभे राहावे कारण त्यांना जळजळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असेही देशपांडे यांनी नमूद केले.