रिझर्व्ह बॅंक आमच्याकडे कधी लक्ष देणार?

Bank-Loan
Bank-Loan

शिवाजीराव भोसले बॅंकेच्या खातेदार-ठेवीदारांचा टाहो; अनेकांचे पैसे गुंतले
पुणे - ॲम्युनेशन फॅक्‍टरीमध्ये नोकरी करून निवृत्तीनंतर मिळालेले २५ लाख रुपये शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत ठेवले. या रकमेच्या व्याजातून कुटुंबाचा खर्च भागेल, मुलीचे लग्न थाटामाटात होईल असे स्वप्न राजेंद्र चव्हाण (नाव बदलले आहे) यांनी पाहिले. मात्र, गैरव्यवहार झाल्याने बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक निर्बंध लादले आणि त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. चव्हाण सध्या ६५ व्यावर्षी सहा हजार रुपये महिन्यावर वॉचमन म्हणून काम करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हीच परिस्थिती बॅंकेच्या हजारो खातेदारांची आहे. निर्बंध लावल्यानंतर दीड वर्षे होऊन गेली तरी खातेदारांना ना रिझर्व्ह बॅंक, ना सहकार खाते वाली उरले आहे. बॅंकेचे तातडीने एखाद्या बॅंकेत विलीनीकरण करून आम्हाला वाचवा असा हाटो खातेदार-ठेवीदारांनी फोडला आहे.

आमदार अनिल भोसले अध्यक्ष असणाऱ्या या बॅंकेत संचालक मंडळानेच केलेल्या गैरव्यवहारामुळे बॅंक अडचणीत आली. बॅंकेची रोख तरलता संपुष्टात आल्याने रिझर्व्ह बॅंकेने ४ मे २०१९ पासून बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादले. त्यामुळे बॅंकेचे ९३ हजार १२८ खातेदार-ठेवीदारांचे ४३२ कोटी रुपये बॅंकेच्या १४ शाखांमध्ये अडकले. या गैरव्यवहारप्रकरणी आमदार भोसले आणि सूर्याजी जाधव हे दोन संचालक सध्या तुरुंगात आहेत. मात्र, ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत किंवा बॅंकेच्या विलीनीकरणाबाबत कोणत्याही हालचाली सहकार विभाग किंवा रिझर्व्ह बॅंकेकडून होत नसल्याबद्दल ठेवीदारांनी तीव्र नाराजी ‘सकाळ’कडे व्यक्त केली आहे. 

सहकारी बॅंकांचे पूर्ण नियंत्रण आता रिझर्व्ह बॅंकेकडे गेल्याने या बॅंकेनेच आता शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेबाबत निर्णय घ्यायला हवा, अशी अपेक्षा खातेदार-ठेवीदार कृती समितीने व्यक्त केली आहे.

बॅंकेचे हजारो खातेदार अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. एसबॅंक, लक्ष्मी विलास यांच्या विलीनीकरणाबाबत तातडीने निर्णय घेणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेने आमच्या बॅंकेच्या विलीनीकरणाबाबतही तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा रिझर्व्ह बॅंकेसमोरच आम्हाला आत्महत्या करावी लागेल. 
- अशोकलाल शहा, खातेदार-ठेवीदार कृती समिती 

बॅंकेचा एनपीए, मालमत्ता पाहता विलीनीकरणासाठी सध्या कोणतीही बॅंक समोर येत नाही. त्यामुळे बॅंक अवसायनात काढावी, असा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेकडे पाठविला आहे. पाच लाखांच्या आतील ठेवी असणाऱ्या ठेवीदारांची संख्या ९९ टक्के आहे, त्यामुळे त्यांना तत्काळ दिलासा मिळेल.
- आनंद कटके, उपनिबंधक, नागरी सहकारी बॅंका 

बॅंकेची सद्यःस्थिती 

  • ४३० कोटी - एकूण कर्जे
  • ३१७ कोटी - थकबाकी
  • ४३२.८६ कोटी - ठेवी
  • ४७३ - थकीत कर्जखाती
  • ३९६ कोटी - एनपीए
  • ४३९४ - हार्डशिप अंतर्गत अर्ज

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com