Pune Metro : पुण्यात मेट्रो केव्हा सुरु होणार?

Pune Metro : पुण्यात मेट्रो केव्हा सुरु होणार?
Updated on

पुणे/कोथरूड : मेट्रो होणार... होणार म्हणून गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या चर्चेला अखेर शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. कारण वनाज-रामवाडी मार्गावरील मेट्रोच्या चाचणीला (ट्रायल रन) आता कोथरूडमध्ये प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखविल्यावर मेट्रोच्या चाचण्या सुरू झाल्या. पहिल्या टप्प्यात वनाज-रामवाडी मार्गावर वनाज ते गरवारे महाविद्यालयादरम्यान ६ किलोमीटर अंतरावर प्रवाशांसाठी वाहतूक डिसेंबरअखेर सुरू होणार आहे.

कोथरूडमधील मेट्रो शेडमधून सकाळी सात वाजता वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान सुमारे तीन किलोमीटर अंतरावर मेट्रोची चाचणी झाली. पवार यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे, महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.मेट्रोची पहिली अनौपचारिक चाचणी ८ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास चाचणी झाली होती. तेव्हा नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते.

पवार म्हणाले, ‘‘पुढची पन्नास वर्षे डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत चला, हा शरद पवार यांचा सल्ला डोळ्यासमोर ठेवून विकास कामे सुरु आहेत. विकासाचे मोठे प्रकल्प राज्याच्या कोणत्याही भागातील असो, राज्य सरकारचा हिस्सा कमी पडू द्यायचा नाही, ही महाविकास आघाडीची भूमिका आहे. देशातील चांगले शहर, सर्व सोयीयुक्त शहर असा पुण्याचा लौकिक वाढला पाहिजे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण करणार नाही.’’ प्रास्ताविक महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले.

दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी मेट्रोची चाचणी यशस्वी झाली ही कॉंग्रेसची स्वप्नपूर्ती असल्याचे सांगितले.

Pune Metro : पुण्यात मेट्रो केव्हा सुरु होणार?
पुणे : कोरोनात १६२० बालके निराधार

प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण

मेट्रो पुणे शहरातून ३३.२० किलोमीटर अंतर धावणार आहे. या मार्गांवर एकूण ३० स्थानकांचा समावेश आहे. एकूण लांबीपैकी २७.२८ किलोमीटर मेट्रो रस्त्याच्या समांतर खांबांवरून (एलिव्हेटेड) धावणार आहे, तर शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान भुयारातून (अंडरग्राऊंड) ६ किलोमीटर मेट्रो धावेल. वनाज ते गरवारे कॉलेजदरम्यान मेट्रोचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच, शहरातील या प्रकल्पाचे काम सुमारे ६० टक्के पूर्ण झाले आहे.

इटलीहून येणार डबे

शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी प्रत्येकी तीन डब्यांच्या ३४ ट्रेन येणार आहेत. त्यातील तीन ट्रेन इटलीहून येतील, तर उर्वरित ३१ ट्रेनचे उत्पादन कोलकता येथे होईल. येत्या तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने या ट्रेन पुण्यात पोचतील. सर्व ट्रेन अॅल्युमिनिअमच्या असतील.

1.एका डब्यातून सुमारे ३०० प्रवाशांची वाहतूक होणार

2.एका डब्यात ४८ प्रवासी बसून, तर सुमारे

२५० प्रवासी उभे राहू प्रवास करू शकतील

3.एका ट्रेनला तीन डबे असणार असून,

त्यातील एक डबा महिलांसाठी राखीव असेल

4.प्रवासासाठी १०, २०, ३०, ४० आणि ५० रुपये भाडे असेल

Pune Metro : पुण्यात मेट्रो केव्हा सुरु होणार?
...तर डेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरणार; WHO चा इशारा

''कोथरूडमध्ये बेरोजगारांची संख्या भरपूर आहे. कामगारांना कायमस्वरूपी काम मिळाले, तर आमची पण जिंदगाणी बदलून जाईल. मेट्रोमध्ये कामगार भरतीत स्थानिकांनापण रोजगार मिळावा.''

- विकी कांबळे, कंत्राटी सफाई कामगार

''थोड्याच दिवसांत मेट्रो धावू लागेल. मेट्रोच्या खांबांवर रात्रीतून जाहिराती चिकटवणे सुरू होईल. त्यासाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या खांबांवर संतवचने, क्रांतिकारकांच्या गाथा लावल्या पाहिजेत.''

- श्याम खिरीड, नागरिक

Pune Metro : पुण्यात मेट्रो केव्हा सुरु होणार?
सीमावर्ती भागात आता ‘अँटी ड्रोन’चा वापर

डिसेंबरअखेर सेवा सुरू होणार

वनाज-रामवाडी मार्गावर वनाज ते गरवारे महाविद्यालयादरम्यान ६ किलोमीटर अंतरावर प्रवाशांसाठी वाहतूक डिसेंबरअखेर सुरू होणार आहे. या मार्गांवर वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप आणि गरवारे महाविद्यालय ही स्थानके असतील. येत्या पाच महिन्यांत ही स्थानके कार्यान्वित होतील. सरकते जिने, प्रवाशांसाठी लिफ्ट, तिकीट विक्री केंद्र, प्लॅटफॉर्म आदी कामे दरम्यानच्या काळात पूर्ण होतील.

Pune Metro : पुण्यात मेट्रो केव्हा सुरु होणार?
‘महारेरा’चा 1800 प्रकल्पांना दणका; पुण्यातील 500 प्रकल्प

असे असेल महामेट्रोचे जाळे

येत्या तीन महिन्यांत (ऑक्टोबर) पिंपरी चिंचवड महापालिका ते दापोडीदरम्यान मेट्रो सुरू होणार आहे, तर भुयारी मेट्रोचे काम पुढील वर्षी पूर्ण होईल. पुढच्या टप्प्यात वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, हडपसर ते वाघोली, स्वारगेट ते कात्रज, शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो टप्प्याटप्प्याने धावणार आहे.

पवार म्हणाले, ‘‘पुढची पन्नास वर्षे डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत चला, हा शरद पवार यांचा सल्ला डोळ्यासमोर ठेवून विकास कामे सुरु आहेत. विकासाचे मोठे प्रकल्प राज्याच्या कोणत्याही भागातील असो, राज्य सरकारचा हिस्सा कमी पडू द्यायचा नाही, ही महाविकास आघाडीची भूमिका आहे. देशातील चांगले शहर, सर्व सोयीयुक्त शहर असा पुण्याचा लौकिक वाढला पाहिजे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण करणार नाही.’’ प्रास्ताविक महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले.

दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी मेट्रोची चाचणी यशस्वी झाली ही कॉंग्रेसची स्वप्नपूर्ती असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune District Grieves the Demise of Former Zilla Parishad Chief Jalindar Kamthe
Agriculture Day celebrated at Ghodegao, Ambegaon with a focus on modern farming techniques and farmer recognition
Three Held, Minor Detained as Pune Police Solve Nine Burglary Cases Across Two States
From Darkness to Light: Eye Donation Ends Six Decades of Blindness
Marathi News Esakal
www.esakal.com