मुख्य प्रवाहात आम्ही येणार कधी?;  तृतीय पंथीयांचा सरकारला सवाल

priya nandini.jpg
priya nandini.jpg

कोथरूड (पुणे) : "मी देवाची भक्ती करते, गाणी लिहिते, जागरण, पूजा- अर्चा करते, पण मंदिरे उघडे नसल्यामुळे आमचे सर्व व्यवहार ठप्प आहेत, आम्ही दारोदारी मागायला पण जातो, परंतु लॉकडाउनमुळे सगळेच बंद झाले. सरकारला आमची विनंती आहे की, आम्हाला उपजीविकेसाठी काम द्यावे, आमच्याकडे भरपूर गुणकौशल्ये आहेत, त्याला वाव द्या, सरकारी सुविधा द्या, पोटतिडकीने या व्यथा तृतीयपंथीयांकडून मांडल्या जात होत्या. 

कोथरूडमधील सागर कॉलनीत दहाबाय दहाच्या खोलीत राहणारी नंदिनी भागवत कांबळे व तिच्या सहकारी घरातील गौरी-गणपतीच्या निमित्ताने भावनांना मोकळी वाट करून देत होत्या. तिच्याबरोबर तिची आई आणि सहकारी राहतात. तृतीयपंथीयांना पण मान द्या, अशी नंदिनी आणि तिच्या सहका-यांची अपेक्षा आहे. 

नंदिनीची सहकारी असलेली स्वीटी दहिभाते दहावीपर्यंत शिकली आहे. तिला नृत्याची आवड आहे. 
प्रिया दोडके बारावी झाली आहे. ती छान मेहंदी, रांगोळी काढते. नृत्याची आवड आहे, आयटम सॉंग, लावणी यांमध्ये प्रावीण्य असल्याचे प्रिया सांगते. तिला फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायची इच्छा आहे. 

नंदिनी, स्वीटी, प्रिया या एकाच शाळेत शिकायला होत्या. वयात आल्यावर त्यांना त्यांच्यातील वेगळेपण जाणवले आणि इतरांपासून त्यांचे अंतर वाढत गेले. देवीच्या भक्तीमध्ये त्यांचे मन रमले. जयभवानीनगर, गोसावी वस्ती, सागर कॉलनी असे सतत घर बदलण्याची वेळ नंदिनीच्या कुटुंबावर आली आहे. भाड्याने खोली घेऊन नंदिनी राहते. स्वतःच्या मालकीचे घर असावे, उपजीविकेसाठी सुरक्षित नोकरी किंवा व्यवसाय असावा अशी नंदिनीची अपेक्षा आहे. तिच्या सुदैवाने तिला सुधीर बापू जाधव हा सहकारी मिळाला. तो उत्तम गायक आहे. गाण्यांना चालीसुद्धा लावतो. नंदिनीने लिहिलेली गाणी सुधीरने गायली आहेत. ती त्याने यु-ट्यूबवर लोड केली आहेत. सुधीरला ढोलकी, डफ, हलगी वाजवण्याचे कौशल्य आहे. 
पुण्यात पावसाचा जोर ओसरणार; यंदा शहरात ५९४.२ मिलिमीटर पावसाची नोंद

सरकार आम जनतेला ज्या सोयीसुविधा देते, त्या प्रत्येक किन्नराला मिळत नाही. समाजात आम्हाला स्थान मिळावे, सरकारने आम्हाला पाठिंबा द्यावा. स्री-पुरुषाला जसा हक्क भेटतो, तसा आम्हालाही हक्क हवा आहे. - प्रिया दोडके, किन्नर 
 

झाडू मारण्याचीही तयारी 
26 नोव्हेंबर 2018 रोजी आधारकार्डसाठी अर्ज केल्याचे नंदिनीने सांगितले. त्याची पावतीसुद्धा मिळाली, परंतु अजूनही आधारकार्ड मिळाले नाही. तीच परिस्थिती माझ्या सहका-यांची आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात झाडूकाम करण्याचे काम मिळावे, अशी नंदिनीची इच्छा आहे. जेवणाचे डबे बनवून ते पोहोच करण्याचीही तिची तयारी आहे, परंतु आम्ही बनवलेले जेवण घ्यायला कोण तयार होईल, कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये आमची उपजीविका भागू शकेल का, याची चिंता नंदिनीला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com