पुणेकरांना, वाहतूक नियम सांगण्यासाठी यमराज उतरले रस्त्यावर

When Yamraj Arrived to manage traffic security operations in pune
When Yamraj Arrived to manage traffic security operations in pune

कोथरुड : वाहतुकीचे नियम पाळले नाही म्हणून प्रत्यक्ष यमराजच समज द्यायला आले तर काय परिस्थिती होईल याचा प्रत्यक्ष अनुभव करीष्मा चौकामध्ये वाहनचालकांना आला. ज्या लोकांनी वाहतुकीचे नियम पाळले नाही त्यांना यमराज येवून समज देत होते नियम पाळण्याची शपथ देवून पुढे पाठवत होते. जे लोक व्यवस्थित नियम पाळत होते त्यांचे कौतुक करत प्रमाणपत्र, गुलाबपुष्प देवून सदिच्छा देत होते. सोबत सुरक्षा नियमांची पुस्तिका वाटली जात होती. जे वाहनचालक हेलमेट, सीटबेल्ट वापरत नाही त्यांना यमराजाने उल्लंघन प्रमाणपत्र व सुरक्षा नियमांची पुस्तिका दिली. 

कर्वेरस्त्यावरील करिष्मा चौकात झालेले यमराजांचे अवतरण उदबोधक आणि लक्षवेधक ठरले. या उपक्रमाचे आयोजन कोथरुड वाहतूक विभाग आणि एस. जे. कॉन्ट्रॅक्ट्स प्रा. ली. यांच्यावतीने करण्यात आले.
 

अंबादास वाघमारे यांनी यमराजाची वेशभूषा केली होती. वाघमारे म्हणाले की, यमराज समजावून सांगत होते. कोणतीही शिक्षा देत नव्हते ही वाहनचालकांसाठी दिलाश्याची बाब होती. प्रतिकात्मक रीत्या केलेल्या या उपक्रमामुळे नियम न पाळणारे खजिल होवून आपल्या चुका कबूल करत होते. नियम पाळू हे अगदी शपथ घेवून सांगत होते हे या उपक्रमाचे यश म्हणावे लागेल असे मला वाटते.

या वेळी कोथरुड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस उपनिरीक्षक भारत क्षेत्री, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय ढमाले, काशीनाथ स्वामी, रणजीत बोरावके, अविनाश भागवत  नितिन खंदारे आणि सुरक्षा व्यवस्थापक दूधनाथ राक्षे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com