पत्नीने चार दारुड्या मित्रांच्याबरोबर शय्यासोबत करावी म्हणून पत्नीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

जनार्दन दांडगे
Friday, 23 October 2020

पत्नीने चार दारुड्या मित्रांच्याबरोबर शय्यासोबत करावी यासाठी, पतीनेच स्वतःच्याच एकोनवर्षीय पत्नीला लोखंडी रॉडने बेदम मारहान केल्याचा धक्कायदायक व मानुसकीला काळीमा फासणारा प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) येथे उघडकीस आला आहे. विशेष बाब म्हणजे पिडीत महिलाचा तिच्या पतीबरोबर दिड वर्षापुर्वी प्रेमविवाह झालेला आहे.

उरुळी कांचन (पुणे) - पत्नीने चार दारुड्या मित्रांच्याबरोबर शय्यासोबत करावी यासाठी, पतीनेच स्वतःच्याच एकोनवर्षीय पत्नीला लोखंडी रॉडने बेदम मारहान केल्याचा धक्कायदायक व मानुसकीला काळीमा फासणारा प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) येथे उघडकीस आला आहे. विशेष बाब म्हणजे पिडीत महिलाचा तिच्या पतीबरोबर दिड वर्षापुर्वी प्रेमविवाह झालेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान या प्रकरणी पिडीत विवाहीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी पिडीत महिलेच्या पतीसह त्याचे चार मित्र, विशाल माने, तानाजी शिंदे, सूरज कांबळे व करण खडसे (रा. पाचही जण, सहजपूर, ता.दौड) या पाच जनांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागताच, पाचही जण फरार झाले असल्याची माहिती लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे. 

मोठी बातमी : 'सीईटी' परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी!

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पिडीत महिला अनिता (नाव बदलले आहे) व तिचा पती (अनिल) यांचे दिड वर्षापुर्वी प्रेमविवाह झालेला आहे. अनिल हा दौंड तालुक्यातील एका कंपनीत कामगार होता. मात्र कोरोनाच्या काळात नोकरी गेल्याने, मागिल सहा महिण्यापासुन घऱीत असतो. मागिल कांही दिवसापासुन अनिलचे वरील विशाल माने, तानाजी शिंदे, सूरज कांबळे व करण खडसे हे चार मित्र दारु पिण्य़ासाठी अनिलच्या घरीच जमत होते. पंधरा दिवसापुर्वी दारु पिल्यानंतर, अनिलने अनिताला वरील चार जनांच्या शय्यासोबत करण्यास सांगितले. यावर अनिताने तसे करण्यास नकार देताच, अनिलने अनिताला मारहान करण्यास सुरुवात केली. मात्र अनिताने अनिलच्या चार मित्रांच्याबरोबर शय्यासोबत करण्यास ठाम नकार दिल्याने, पंधऱा दिवसापुर्वी अनिल व अनिताचा वाद तात्पुरत्या स्वरुपात मिटला होता. 

प्रॉपर्टी कार्डला आता कायदाच ठरत आहे अडसर

दरम्यान पाच दिवसापुर्वी म्हणजे सोमवारी (ता. १९) रात्री आठ वाजनेच्या सुमारास अनिल व त्याचे वरील चार मित्र दारु पिण्यासाठी अनिताच्या घरी जमले होते. दारु पिणे चालु असतानाच, पुन्हा एकदा अनिलने अनिता चार मित्रांच्यासोबत शय्यासोबत करण्यास सांगितले. यावेळीही अनिताने नकार देताच, अनिल व त्याच्या चारही मित्रांनी अनिताला लोखंडी ऱॉड व लाथाबुक्क्यांनी मारहान करण्यास सुरुवात केली. मात्र मारहान करुनही शय्यासोबतीस अनिता तयार होत नसल्याचे लक्षात आल्याने, अनिलचे चारही मित्र रात्री अकरा वाजनेच्या सुमारास आपआपल्या घरी निघुन गेले. मित्र निघुन जाताच, अनिताला अनिलने पुन्हा मारहान करण्यास सुरुवात केली. अखेर अनिल अनिताला मारहान करत असल्याची बाब, अनिता राहत असलेल्या घरमालकाच्या लक्षात आल्यानंतर अनिताची मारहानीतुन सुटका झाली.

पुण्यातील प्रकार; कोरोना रुग्णांची आर्थिक लूट करत बिलांत ७८ लाख जादा आकारल्याचे उघड 

याबाबत अधिक माहिती देतांना पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, दारुड्या मित्रांच्याबरोबर शय्यासोबतीस नकार दिल्याने, पतीने व त्याच्या मित्रांनी विवाहीत महिलेला केलेली मारहान ही मानुसकीला काळीमा फासणारी आहे.  पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पतीसह त्याच्या चार मित्रांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल होण्यापुर्वीच पतीसह त्याचे चार मित्र फरार झाले आहेत. वरील पाचही जनांच्या अटकेसाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. पिडीत महिलेला न्याय मिळवुन देणे हे पोलिसांचे प्रथम कर्त्यव्य असुन, पोलिस यात कुठेही कमी पडणार नाहीत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife beaten death iron rod sleep with four drunken friends