दुसऱ्या लग्नाची दिली कबुली मग काय...बायकोने नवऱ्याचा गळाच चिरला

Wife Killed Husband by Cutting throat in Pune
Wife Killed Husband by Cutting throat in Pune

धायरी(पुणे) : प्रियकराकडून फसवणूक झाल्याने संतापलेल्या प्रेयसीने प्रियकराचा गळा चिरुन त्याचा खून केला. मंगळवारी पहाटे साडे चार वाजता नऱ्हे येथील एस. के .नाईक कंपनी समोर नारायण निवास इमारतीत ही घटना घडली. 

महंतेश बिरादर (वय २८, रा. संख किरंडी, या.जत, जि. सांगली) असे या प्रकारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांचे नांव आहे.  या प्रकरणी अनुराधा करे (वय २४, रा.नऱ्हे - धायरी रोड, नऱ्हे मूळ : करेवाडी, जत, सांगली) या परिचारिकेला पोलिसांनी अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि, महंतेश व अनुराधा हे बालपणीचे मित्र. एकाच शाळेत त्याचे शिक्षण झाले. चार पाच वर्षांपूर्वी नोकरी व्यवसायानिमित्त पुण्यात आल्यावर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अनुराधा करे या कै. काशिबाई नवले रुग्णालयात परिचारिका म्हणून तर, महंतेश वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत होता. बरेचदा ते एकत्रच रहात असत. त्यातून उद्भवलेल्या भांडणातून दोन वर्षांपूर्वी अनुराधाने सिंहगड पोलिस ठाण्यात महंतेश विरुध्द बलात्काराचा गुन्हाही नोंदविला होता. परंतु, नंतर त्यांच्यात तडजोडही झाली होती, दोघांनी आळंदी येथे जाऊन विवाहही केला होता, असेही पोलिसांनी सांगितले.

'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन

लग्नानंतर महंतेश अनुराधाला टाळू लागला. तो महिनोंन महिने घरीही येत नसे. दरम्यान गावाकडेच मुक्काम ठोकून राहिलेल्या महंतेशने तिकडे दुसरे लग्न केले अशी कुणकूण अनुराधाला लागली होती.

त्यामुळेच काल रात्री (सोमवारी दि. २ मार्च) दारु पिऊन घरी आलेल्या महंतेशला तिने दुसऱ्या लग्नाबद्दल जाब विचारला. दारूच्या नशेतच त्याने दुसऱ्या लग्नाची कबुली दिली. त्यामुळे अनुराधा संतापली. तो झोपल्यानंतरही सुडाने पेटलेली अनुराधा जागीच होती. त्याच रागाच्या भरात पहाटे चार साडेचारच्या सुमारास घरातील कोणत्याने गाढ झोपेत असलेल्या महंतेशचा गळा चिरला. तीव्र रक्तस्रावामुळे तो जागीच मरण पावला.
महंतेश मरण पावल्याचे लक्षात आल्यावर अनुराधानेही गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो सफल न झाल्याने आपल्या गावी फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती तिने वडिलांना दिली. नंतर त्यांच्या सल्ल्यानुसार ती नऱ्हे पोलिस चौकीत जाऊन तिने गुन्ह्याची कबुली दिली. सिंहगड पोलिस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com