मोशीतील घरांसाठी मार्चपासून अर्ज मागविणार

मोशी - प्राधिकरणाच्या वतीने पेठ क्रमांक १२ मध्ये बांधण्यात येत असलेल्या पाच हजार घरांच्या इमारतींचे काम वेगाने सुरू आहे.
मोशी - प्राधिकरणाच्या वतीने पेठ क्रमांक १२ मध्ये बांधण्यात येत असलेल्या पाच हजार घरांच्या इमारतींचे काम वेगाने सुरू आहे.

पिंपरी - मोशी येथील पेठ क्रमांक १२ मध्ये प्राधिकरणाच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या घरांसाठी मार्च किंवा एप्रिलपासून अर्ज मागविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. या गृहनिर्माण प्रकल्पासाठी सुमारे ५५४ कोटी रुपये खर्च करण्यात येत असून, त्यापैकी आतापर्यंत ६५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

या प्रकल्पाला प्राधिकरणाने फेब्रुवारी २०१८ मध्ये मान्यता दिली. एकूण ९.३४ हेक्‍टर क्षेत्रफळावर हा प्रकल्प साकारत आहे. त्यासाठी २.४ चटईक्षेत्र निर्देशांक वापरण्यात येत आहे. एकूण ४८८३ घरे बांधण्यात येत असून, १४० दुकानेही उपलब्ध होणार आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) ३१७ चौरस फूट, तर कमी उत्पन्न गटासाठी (एलआयजी) ६३८ चौरस फूट कार्पेट एरिया असलेली घरे बांधण्यात येत आहेत. २१ फेब्रुवारी २०१९ ला कामाचा आदेश देण्यात आला असून, कामाची मुदत २४ महिने आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरवातीला हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा, म्हणून ॲल्युफॉर्म तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या कामासाठी सहा सेट वापरण्यात येत होते. कामाचा वेग वाढण्यासाठी प्रशासनाने आणखी दोन सेट वाढविण्यास सांगितले आहेत. त्याचप्रमाणे सध्या रस्ता विकासाची कामेही वेगाने सुरू आहेत. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने येथील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. महापालिकेची जलवाहिनी प्रकल्पाजवळच आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या जलवाहिनीतून पाण्याचे केवळ कनेक्‍शन घ्यावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com