रखडलेल्या रस्त्यामुळे वाढतेय वाहतुककोंडी; केव्हा सुटणार समस्या?

Will the problem of blocked roads be solved
Will the problem of blocked roads be solved

आंबेठाण(पुणे) :औद्योगिक विभाग जोडण्यासाठी शासनाकडून सुरू केलेल्या हायब्रीड anuti ही महत्वकांक्षी योजना सुरू करण्यात आली. त्याचे काम ही सुरू आहे परंतु काही ठिकाणी स्थानिकांनी काम अडविल्यामुळे खराब रस्त्यामुळे वाहतूकीची समस्या निर्माण होत आहे. रखडलेल्या या काही अंतराबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ मार्ग काढावा अशी मागणी केली जात आहे.

 'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

नुतनीकरण होत असलेल्या बहुतांश ठिकाणी काम मार्गी लागले असून काही ठिकाणी जागेच्या वादामुळे काम अडविले गेल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यात कडक आणि स्पष्ट भूमिका घेऊन रस्त्याच्या जागेचा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरुन रखडलेले काम मार्गी लागेल अशी मागणी केली जात आहे.

राज्यासह देशात लॉकडाउन काळात जिल्ह्यातील सुरू असणारी प्रमुख रस्त्यासह अन्य कामे अर्धवट थांबवावी लागली होती परंतु अनलॉकनंतर कामे सुरू झाली. त्यानंतर त्यातील बहुतेक कामे मार्गी लागत आहे. परंतु काही ठिकाणी एका बाजूला रस्ता वाढविला जात आहे. घरे मध्येच येतात. विजेच्या खांबांची अडचण अशा विविध कारणांमुळे सुरू असणाऱ्या रस्त्याचे काम अडविले गेले. त्यामुळे बहुतांश रस्ता मार्गी पण, काही ठिकाणी काम पूर्ण ठप्प अशी परिस्थिती झाली.

अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!​

परिणामी, रस्ता काही ठिकाणी रखडला आहे. कामगार काम करायला गेले तर स्थानिक नागरिक काम बंद पाडतात. स्थानिक नागरिकांच्या असणाऱ्या मागण्या लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यात समनव्यय घालून रखडलेले काम मार्गी लावण्याची गरज आहे. तसेच आंबेठाण येथील बाह्यवळण देखील तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी प्रवाशी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

शासनाच्या बजेट मधून जिल्ह्यातील औद्योगिक विभागातील रस्ते रुंदीकरण आणि नूतनीकरण करण्यासाठी हायब्रीड anuti (टीएन२७)ही योजना आखली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील खेडमधील तीन, मावळ मधील दोन आणि पुरंदरमधील एक असे सहा रस्ते केले जात आहे.

गारठलेले विद्यार्थी परतले;रशियात शिकणाऱ्या भावी डॉक्‍टरांची अनेक अडथळ्यांवर मात 

आकडेवारी - 
 निधी- २१३ कोटी, रस्ते-६, अंतर-४७ किमी.

 सहा रस्ते पुढीलप्रमाणे - 
  १) चाकण ते भांबोली फाटा ( प्रजिमा २०,१० किमी )
  २) आसखेड फाटा ते करंजविहीरे मार्गे नवलाख उंबरे खिंड ( प्रजिमा १७-अ,८.५ किमी)
 ३) निघोजे ते मोई मार्गे चिंबळी फाटा ( प्रजिमा १७-ब,९ किमी )
 ४) मावळ – नवलाख उंबरे ते बधलवाडी ( प्रजिमा    क्रमांक १५,४ किमी)
 ५) नवलाख उंबरे ते इंदोरी ( प्रजिमा क्रमांक १०३,८.७५० किमी )
 ६) जेजुरी ते कोळविहीरे (प्रजिमा क्रमांक १३४,६.५ किमी )


''काम अडविलेल्या नागरिकांना दोन वेळा समजावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी त्यांनी होकार दिला परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा काम बंद पाडतात. त्यांना कायदेशीर नोटीस दिली असून पुन्हा काम बंद केले तर पोलिस बंदोबस्तात काम सुरू करावे लागेल. आंबेठाण बाह्यवळण बाबत निवडणूक ड्युटी लागल्याने मोजणी पुढे ढकलली आहे. मोजणी करून भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केला जाईल.''
- संतोष पवार (शाखा अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com