#Lockdown2.0 : उद्योग नगरीतच कामगार वेतनाशिवाय

without salary labor are facing issue in industrial area of pimpri
without salary labor are facing issue in industrial area of pimpri

पिंपरी : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची वेतन व मनुष्यबळ कपात करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र, त्याला खासगी कार्यालये आणि कंपन्या हरताळ फासत आहेत. लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांनी कामगारांच्या खात्यावर संपूर्ण, तर काहींच्या खात्यावर निम्मे वेतन जमा केले आहे. परिणामी,  उद्योगनगरीतच अनेक कामगार वेतनाशिवाय असल्याची वस्तुस्थिती आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये सुमारे चार लाखांपर्यंत कंत्राटी कामगार आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर अनेक स्थानिक कामगारांनी तातडीने आपले घर गाठले आहे. मात्र, बहुसंख्य परप्रांतीय कामगार अद्यापही शहरातच अडकलेले आहेत.

#Lockdown2.0 : निम्मे पिंपरी-चिंचवड सीलबंद

लॉकडाऊन काळात गरिबांना फटका बसणार नाही याकरिता कार्यालये व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची वेतन व मनुष्यबळ कपात करू नये, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. परंतू अनेक खासगी कंपन्या  व लघु उद्योगांमधील कामगारांची पेमेंट शीटच तयार झालेली नाही. अनेक कंपन्यांनी कामगारांचे महिन्याचे निम्मेच वेतन बॅंक खात्यावर जमा केले आहे. तर अनेक लघुद्योगांमधील कामगार वेतनाशिवाय आहेत.  कंत्राटदाराने अनेक कामगारांचे पगार केलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या रेशन आणि जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यात प्रामुख्याने काही खासगी रुग्णालयातील लॅब टेक्निशियन, अटेंडस,  वॉर्डबॉय, आया, मावशी, कंपन्यातील सुरक्षा रक्षक या घटकाला अजून वेतन मिळाले नाही 

Coronavirus : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लढा ‘वॉर रूम’मधूनही

लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने कामगारांचे वेतन झाले नाही तर, दुसरीकडे जीवनावश्‍यक वस्तु कशा मिळणार  आहे. कामगारांचे वेतन जमा करणारे कर्मचारी गावाला गेले आहेत; तर अनेक जणांना लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडता येत नाही. तसेच कंपनीची उलाढाल ठप्प झाल्याने . वेतनकपात होण्याची भीती कामगारांमध्ये आहे. त्यातल्या त्यात काही कंपन्यांनी कामगारांचे संपूर्ण वेतन जमा आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कान्हे शाखेच्यावतीने पीक कर्ज वाटपास सुरुवात

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com