तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या महिला गुन्हेगारास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

चोरी, घरफोडीचे गुन्हे करणाऱ्यामुळे पोलिसांनी तडीपार केल्यानंतरही तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या महिला गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी अटक केली. बुधवारी दुपारी मंगळवार पेठेतील सदानंद नगर परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली. 

पुणे : चोरी, घरफोडीचे गुन्हे करणाऱ्यामुळे पोलिसांनी तडीपार केल्यानंतरही तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या महिला गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी अटक केली. बुधवारी दुपारी मंगळवार पेठेतील सदानंद नगर परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेश्‍मा रज्जाक शेख (वय 30, रा. मंगळवार पेठ जुना बजार) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस ठाण्याचे तपास पथक बुधवारी महाष्ट्र बंदच्या पार्श्‍वभुमीवर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालीत होते. त्यावेळी वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे तडीपारची कारवाई केलेली महिला गुन्हेगार मंगळवार पेठेतील सदानंदनगर येथे फिरत असल्याची खबर पोलिसांना मिळाली.

भारतात कोरोना विषाणूचा पहिला बळी; केरळमध्ये आढळला रुग्ण

त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलिस कर्मचारी सुशील लोणकर, सुशिल काळे, राजस शेख, निलेश साबळे, सोनल माकर यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचून महिलेला ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शेख हिने खडक, फरासखाना व समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी, घरफोडीचे गुन्हे गेले आहेत. तिच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांवरुन तिला तडीपार करण्याचा प्रस्ताव समर्थ पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यानुसार, तिला परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्तांनी 21 जुन 2019 रोजी एक वर्षांसाठी शहरातून तडीपार करण्याबाबतचा आदेश दिला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman arrested Who violating Tadipar order