Pune News : पुणेकरांनो बसमध्ये चढताना काळजी घ्या! पीएमपी बसच्या चाकात पाय अडकून महिलेचा मृत्यू

काशीबाई खुंरगळे (रा. दांडेकर पूल) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
woman died after her leg got stuck in the wheel of a PMP bus marathi news
woman died after her leg got stuck in the wheel of a PMP bus marathi news

पुणे, ता. १७ : पीएमपी बसमध्ये चढत असताना चाकामध्ये पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ पेट्रोल पंपासमोर घडली.

काशीबाई खुंरगळे (रा. दांडेकर पूल) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा मल्हारी पांडुरंग खुरंगळे (वय ३१, रा. दांडेकर पूल) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पीएमपी बसचालक दिलीपराव वामनराव लहाने (वय ५०, रा. मांजरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

woman died after her leg got stuck in the wheel of a PMP bus marathi news
Corona Compensation: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला हायकोर्टाने नाकारली 50 लाखांची भरपाई, दिले 'हे' कारण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सोमवारी दुपारी पीएमपी बसमध्ये पाठीमागील दरवाजातून चढत होती. परंतु त्यावेळी बसचालकाने निष्काळजीपणे बस चालवली. त्यामुळे महिलेचा डावा पाय बसच्या चाकामध्ये अडकला. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

woman died after her leg got stuck in the wheel of a PMP bus marathi news
Wagholi Traffic Jam: वाघोलीला अवकाळीचा फटका! भर रस्त्यात होर्डींग कोसळल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com