पुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातात महिला जागीच ठार

सावता नवले
Thursday, 28 January 2021

पुणे सोलापूर रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ अज्ञात चार चाकीच्या धडकेने महिला जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी (ता. 25) रात्री साडेआठ वाजता घडली.

कुरकुंभ  : पुणे सोलापूर रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ अज्ञात चार चाकीच्या धडकेने महिला जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी (ता. 25) रात्री साडेआठ वाजता घडली.

'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'

महामार्गावर कुरकुंभ येथील उड्डाण पुलाजवळ पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या लेनवर अज्ञात चारचाकी गाडीने महिलेला जोरात धडक दिली. या अपघातात फुलोदेवी बिहारी मुखिया (वय २५, सद्या रा. कुरकुंभ ता. दौंड. मूळ रा. बिहार.) ही महिला गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाली.

 भाजपचा कट्टर नेता शिवसेनेत, समीर देसाईंच्या येण्याने गोरेगावात सेना होणार अधिक...

याबाबत बिहारी मुखिया बिराजी मूखिया म यांनी दौंड पोलिसात फिर्याद दिली आहे. मृत महिला भिगवण (ता. इंदापूर) सासऱ्याकडे निघाली होती.

या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमृता काटे, हवालदार एस. एम. शिंदे, मारुती हिरवे, राकेश फाळके, दत्तात्रेय चांदणे, अमोल राऊत, एम. एम. पवार करीत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman killed in accident near flyover on Pune-Solapur road