बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

मंचर ते चांडोली खुर्द (ता आंबेगाव)जुन्या रस्त्यावर अंगणवाडी जवळ मोटरसायकल वरून प्रवास करणाऱ्या स्नेहा नामदेव थोरात (वय २७ रा. चांडोली बुद्रुक) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
Injured Sneha Thorat
Injured Sneha ThoratSakal
Summary

मंचर ते चांडोली खुर्द (ता आंबेगाव)जुन्या रस्त्यावर अंगणवाडी जवळ मोटरसायकल वरून प्रवास करणाऱ्या स्नेहा नामदेव थोरात (वय २७ रा. चांडोली बुद्रुक) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

मंचर - मंचर ते चांडोली खुर्द (ता आंबेगाव)जुन्या रस्त्यावर अंगणवाडी जवळ मोटरसायकल वरून प्रवास करणाऱ्या स्नेहा नामदेव थोरात (वय २७ रा. चांडोली बुद्रुक) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सदर घटना गुरुवारी (ता २७) रात्री नऊच्या दरम्यान घडली.

स्नेह थोरात यांचे मंचर येथे ब्युटी पार्लरचे दुकान आहे. गुरुवारी रात्री त्या दुकान बंद करून पती नवनाथ थोरात यांच्या समवेत मोटर सायकल वरून घराकडे जात होत्या. स्नेहा मागील बाजूस बसल्या होत्या. अंगणवाडी जवळ दबाव धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे स्नेहा यांच्या अंगावर झेप घेऊन उजव्या पायाला पंज्याने जोरदार फटका मारला. बिबट्याला पाहून या दाम्पत्यांची घाबरगुंडी उडाली. अशाही बिकट परिस्थितीत प्रसंगावधान राखून मोटरसायकलचा तोल सांभाळत न थांबताच नवनाथ थोरात व स्नेहा हे मोटरसायकल वरून घरी गेले. त्यावेळी स्नेहा यांच्या उजव्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता.असह्य वेदनामुळे त्या त्रस्त झाल्या होत्या.

त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने स्नेहा यांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा दाखल करण्यात आले वन खात्याचे वनपाल संभाजीराव गायकवाड यांना हा प्रकार कळवल्यानंतर ते तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आले. डॉ. संजय दुढवडे, डॉ. प्रतिभा कहडणे,डॉ शिवाजी जाधव डॉ श्वेता गोराणे हे उपचार करत आहेत. स्नेह यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे मंचर-चांडोली खुर्द परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन खात्याने या भागात त्वरित बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवीण मोरडे व राजाबाबू थोरात यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com