esakal | 'रॉ' एजंटकडून फेसबुकवरुन मैत्री झालेल्या महिलेवर बलात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

'रॉ' एजंटकडून फेसबुकवरुन मैत्री झालेल्या महिलेवर बलात्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - महिलेस नग्न व्हिडीओ आणि छायाचित्र समाजमाध्यमवर टाकण्याची धमकी देत कथित "रॉ" एजंटने (Raw Agent) फेसबुकवरुन (Facebook) मैत्री (Friendship) झालेल्या एका महिलेवर बलात्कार (Women Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. आरोपीने "रॉ"चे बनावट ओळखपत्र दाखवून पिडीत महिला व तिच्या कुटुंबीयांचा छळ केला होता. (Women Raped by Raw Agent Crime)

नितेश उर्फ निकेश राठोड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 31 वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 2018 ते 14 जुलै या कालावधीत फिर्यादीच्या राहत्या घरी घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोड याची सुरुवातीला फेसबुकच्या माध्यमातून फिर्यादी महिलेच्या बहिणीसोबत ओळख झाली होती. त्यातून दोघांचा परिचय झाला. आपण अनाथ असल्याचे सांगून राठोड याने फिर्यादी महिलेला आपल्या जाळ्यात खेचले. त्यानंतर जवळीक निर्माण केली. फिर्यादी महिलेला तिच्या घरच्यांना मारून टाकेल अशी धमकी देत नग्न व्हिडिओ तयार करून ते त्याला पाठविण्यास भाग पाडले. तसेच व्हिडिओ कॉलवर देखील तो फिर्यादी महिलेसोबत अश्लिल वर्तन करत असे.

हेही वाचा: पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी 'क्‍लोजर रिपोर्ट' नाही, अजूनही तपास सुरूच

राठोडकडून सतत होणार्‍या मानसिक त्रासाला कंटाळून फिर्यादी महिलेने दोनवेळ घरातील मुदतबाह्य गोळ्या खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राठोड याने फिर्यादीचे व्हिडिओ व छायाचित्र समाजमाध्यमवर टाकण्याची धमकी देत अनेकवेळा बलात्कार केला. त्यानंतर राठोड याने व्हिडिओ व छायाचित्र फिर्यादीची बहिण व भावाला पाठवले. तसेच फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एअरड्रॉईड नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यांच्या परवानगीशिवाय मोबाईलवर स्वत:चा ताबा ठेवला होता.

loading image