esakal | लॉकडाऊनमध्ये महिलांचा 'असा' होणार कौशल्य विकास
sakal

बोलून बातमी शोधा

women skills development in lockdown.jpg

पुणे : "कोरोना'मुळे बरोजगारीचे संकट कोसळणार असल्याने अशा काळात महिलांना नवीन नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग पुणे उपकेंद्र आणि टेक महिंद्रा फाऊंडेशनतर्फे जीएसटी अकौन्ट्‌स साहाय्यक व कार्यालयीन व्यवस्थापन याचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे.

लॉकडाऊनमध्ये महिलांचा 'असा' होणार कौशल्य विकास

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : 'कोरोना'मुळे बरोजगारीचे संकट कोसळणार असल्याने अशा काळात महिलांना नवीन नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठातील आजीवन व विस्तार विभाग पुणे उपकेंद्र आणि टेक महिंद्रा फाऊंडेशनतर्फे जीएसटी अकौन्ट्‌स साहाय्यक व कार्यालयीन व्यवस्थापन याचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

इंग्रजी संभाषण, व्यक्तिमत्व विकास, संप्रेषण, नेतृत्व गुण, नवीन तंत्रज्ञानात्मक कौशल्य शिकवले जाणार आहे. लॉकडाउननंतर शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. त्याचा अनुभव ह्या महिला घेऊन नवीन जगासाठी तयार होत आहेत. 18 ते 45 वयोगटातील समाजातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन टेक महिंद्रा फाऊंडेशनचे व्यवस्थापक मनोज सकते यांनी सांगितले.

आणखी वाचा - महाराष्ट्रात राबवा बारामती पॅटर्न!

उपकेंद्राने विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्याशी संपर्क साधून तीन दिवसात 406 अर्ज आले त्यानंतर अर्ज आले. यातून निवड झालेल्या महिलांना प्रीती कोरी आणि अपूर्वा देशपांडे हे ऑनलाईश प्रशिक्षण देत आहेत.
"बेरोजगारांची स्थिती आणि येत्या काळातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन असे अल्पकालीन प्रशिक्षणवर्ग लॉकडाउनच्या काळात आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात सुरु करण्याची नितांत गरज आहे" असे मत प्रकल्प संचालक व सहाय्यक प्राध्यापक डॉ. भास्कर इगवे यांनी व्यक्त केले आहे.

आणखी वाचा - मुंबई-पुण्यात पसरली अफवा; वाचा सविस्तर बातमी

लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झालेल्या महिलांसाठी री-स्किल्लींगचे 30 ते 50 तासांचे वर्कशॉप्स 15 मे पासून सुरु होणार आहेत. प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/cHTW7RMZNTH2TLeq7 ह्या लिंकवरील माहिती भरावी किंवा गूगल 7709498999/ 9881473133 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसएनडीटीतर्फे करण्यात आले आहे.

आणखी वाचा - पुण्यात आयटी कंपन्यांमध्ये सुरू झाली पगार कपात 

loading image
go to top