esakal | Woman's Day 2021 : माझ्यासाठी तोच सुवर्ण क्षण : निवृत्त फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे

बोलून बातमी शोधा

Womens Day 2021 Retired Flight Lieutenant Shivali Deshpande }

महिला दिनानिमित्त सकाळशी संवाद साधताना सांगत होत्या फ्लाइट लेफ्टनंट (निवृत्त) शिवाली देशपांडे. मुळच्या नागपूर येथील असलेल्या देशपांडे या १९९७ मध्ये हवाईदलात दाखल झाल्या होत्या.

Woman's Day 2021 : माझ्यासाठी तोच सुवर्ण क्षण : निवृत्त फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : लहानपणापासूनच घरात लष्कराचे वातावरण होते. त्यामुळे देशसेवेची परंपरा आपण सुद्धा पुढे घेऊन जाऊ असा ध्यास मनाशी घट्ट केला. देशासाठी कर्तृत्व बजावण्याची जिद्द असल्यामुळे राष्ट्रीय छात्र सेना दलात (एनसीसी) असताना १९९३ मध्ये सर्वोत्कृष्ट महिला कॅडेटचा मान मिळविला. एनसीसीच्या माध्यमातून इंग्लंड या देशात भारताचे नेतृत्‍व केले. तर, भारतीय हवाईदलाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अॅकॅडमीच्या महिला व पुरुष
याच्या एकत्रित असलेल्या दीक्षांत संचलन सोहळ्याचे नेतृत्व करणारी पहिली महिला ठरले. हा क्षण माझा परिवारासाठी सुवर्ण क्षण ठरला. 

महिला दिनानिमित्त सकाळशी संवाद साधताना सांगत होत्या फ्लाइट लेफ्टनंट (निवृत्त) शिवाली देशपांडे. मुळच्या नागपूर येथील असलेल्या देशपांडे या १९९७ मध्ये हवाईदलात दाखल झाल्या होत्या. त्यांनी शॉर्टसर्व्हिस कमिशन अंतर्गत हवाईदलाच्या ‘एअर ट्रॅफिक आणि फायटर कंट्रोलर’ विभागात पाच वर्षांचे सेवाकार्य केले. मात्र, लष्करातून निवृत्ती झाल्यानंतरही मुलींना लष्करात जाण्याची ओढ निर्माण व्हावी यासाठी त्या सातत्याने तरुणींना प्रेरित करत आहेत. तर संरक्षण विश्‍लेषक म्हणून देखील त्या ओळखल्या जातात.

माध्यमातील 'स्त्री' प्रतिमा कशी ?; त्याचे उत्तर 'चित्रभाषेत' 
देशपांडे म्हणाल्या, ‘‘सध्या मुलींसाठी लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये विविध संधी उपलब्ध आहेत. मी जेव्हा लष्करात दाखल झाले त्यावेळी फार कमी
संख्येनी महिला या क्षेत्रात येत होत्या. काळानुसार आता बदल घडत आहे आणि  देशभरातून दरवर्षी मोठ्या संख्येनी महिला या क्षेत्रात येत आहेत. तर आता विविध विभागातील महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी (पर्मनंट कमिशन) मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता महिला अधिकाऱ्यांना लष्करात अधिक काळासाठी सेवाकार्य करण्याची संधी मिळेल.’’

प्रहार समाज जागृती संस्थेच्या माध्यमातून अनुशासन, निर्भयता, जागृकता,
नैतिक मूल्यांचे जतन आणि देश प्रेम या पाच सैनिकी गुणांना तरुणांमध्ये 
रुजविण्याचे कार्य करत आहोत. त्यामुळे सैन्याबरोबरच समाजातही अनुशासितनागरिक तयार होतील. तर लष्करात जाऊ इच्छिणाऱ्या मुला मुलींना मोफत मार्गदर्शन करत आहोत. तर लष्करात कोण कोणते पर्याय उपलब्ध आहेत त्यासाठीतयारी कशी असावी या सर्व बाबींची माहिती दिली जाते. असेही देशपांडे यांनी सांगितले.

Womens Day Special; पिंक पाहिला,पण कळला का?; काळसर, गुलाबी खंजीराची वेदना...

‘‘आधुनिक तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे  लष्करातही त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मग ते आधुनिक युद्ध नीती असो किंवा लष्कराला लागणारे शस्त्र. सध्याच्या पिढीने केवळ अॅडव्हेंचरसाठी किंवा सैन्यात कष्ट खूप आहे हा विचार बाळगत लष्करात दाखल  होऊ नये. आपण शिक्षण घेतलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा देशाला फायदा होईल  हा विचार करत लष्कराच्या विविध विभागांमध्ये कार्य करण्यासाठी इच्छाशक्ती  दाखवली पाहिजे.’’
- फ्लाइट लेफ्टनंट (निवृत्त) शिवाली देशपांडे