Women's Day 2023 : महिला सफाई कामगारांना स्वच्छता दूत पुरस्काराने सन्मान

महिलांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे : उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील
Women's Day 2023 sweepers Women honored Swachhta Dut award pune
Women's Day 2023 sweepers Women honored Swachhta Dut award punesakal

मंचर : “स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. पण तरीही तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. स्त्रीयांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे. कारण पुढची पिढी कशी घडवायची हे स्त्रीच्या हातात आहे. स्त्री सन्मानाची सुरवात प्रत्येकाच्या घरापासून झाली पाहिजे.

आर्थिक व्यवहार महिलांच्या हातात द्यावेत. त्या काटकसरीने खर्चात बचत करतात. त्यामुळे कुटुंबाची वाटचाल प्रगतीकडे सुरु होईल.” असा विश्वास खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी व्यक्त केला.

Women's Day 2023 sweepers Women honored Swachhta Dut award pune
Women's Day 2023 : कुटुंब सौख्य राखत 'स्व'पणा जपणारी पौराणिक स्त्री... द्रौपदी

मंचर (ता.आंबेगाव) येथील बाजार समितीच्या शरद पवार सभागृहात ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त १० कष्टकरी महिलांना “स्वच्छता दूत पुरस्कार” व शेतकरी महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते. याप्रसंगी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ जुन्नर शाखा व्यवस्थापक सविता चकवे-डुंबरे, बाजार समितीचे सचिव सचिन बोऱ्हाडे, नायब तहसीलदार लता वाजे, ज्ञानशक्तीच्या उपाध्यक्षा रंजना शेटे, संगिता वाव्हळ, धनंजय घुले. गावडेवाडीच्या सरपंच स्वरूपा गावडे उपस्थित होत्या.

Women's Day 2023 sweepers Women honored Swachhta Dut award pune
Womens Day Special: अदितीने दाखवला दुष्काळग्रस्त परिस्थितीशी दोन हात करण्याचा लातूर पॅटर्न!

यावेळी ज्ञानशक्ती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सफाई कामगार ज्योती संजय टेमकर, आशा राजेंद्र मिरके,पुष्पा जालिंदर कसबे, विद्या यशवंत भालेराव, कांताबाई पोपट गायकवाड, सुमन देवराम गावडे, रंजना भिवसेन मोरे, सुरेखा रोहिदास शिंदे,

गुलनाज खालिद शेख, शुभांगी संतोष राजगुरू यांना स्वच्छता दूत व शितल नवनाथ विश्वासराव यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भेटवस्तू, फळझाड सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Women's Day 2023 sweepers Women honored Swachhta Dut award pune
Womens Day special : ‘महिलांनो शरीराचे हाल करू नका, वेळीच ‘Silent killer’ ना ओळखा’

चकवे-डुंबरे म्हणाल्या “आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून ती आपल्या जीवाचे रान करते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. स्वराज्यनिर्मितीसाठी शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, लहानग्याला पाठीशी बांधून रणांगणावर लढणाऱ्या बहादुर झाशीची राणी लक्ष्मीबाई, अलौकिक समाजकार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर,

महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आकाशाला गवसणी घालणाऱ्या कल्पना चावला, पहिल्या महिला पोलिस अधिकारी किरण बेदी, भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी देशाच्या प्रगतीसाठी बिकट संघर्षातून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांचा आदर्श प्रेरणा व प्रोत्साहन देणारा आहे.”

Women's Day 2023 sweepers Women honored Swachhta Dut award pune
women day 2023 : आईच्या पाठबळाने स्नेहा यांची न्यायाधीश पदाला गवसणी

ज्ञानशक्तीच्या मुख्य अधिकारी गार्गी काळे पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या “आत्तापर्यंत कोणताही पुरस्कार न मिळालेल्या कष्टकरीमहिलांचा शोध घेऊन स्वच्छता दूत पुरस्कार देऊन सन्मानित केले . या महिला उपजिल्हा रुग्णालय, मंचर नगरपंचायत. ग्रामपंचायत तहसीलदार कार्यालय आदी ठिकाणी वर्षानुवर्ष स्वच्छतेचे काम करतात.

या पुरस्कारामुळे त्यांना काम करण्याची उर्जा मिळेल.” जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, यांची मनोगते झाले. मोनिका थोरात, प्रा.रोहिणी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्ना काळे यांनी आभार मानले. वैभव पोखरकर, अरुण गभाले, अनिता चौधरी यांनी व्यवस्था पहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com