esakal | #Womens Day : ‘घरच्या घरी मेकअप’विषयी ऑनलाइन मार्गदर्शन

बोलून बातमी शोधा

Vaishali-Vijay-Pallavi

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरी मेकअप तसेच चेहरा व केसांची काळजी कशी घ्यावी, या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळ आणि पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते.

#Womens Day : ‘घरच्या घरी मेकअप’विषयी ऑनलाइन मार्गदर्शन
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरी मेकअप तसेच चेहरा व केसांची काळजी कशी घ्यावी, या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळ आणि पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. ब्युटीशियन पल्लवी तावरे आणि त्यांच्या टीमने उपस्थित महिलांना दोन सत्रांत प्रात्यक्षिकासह पर्सनल मेकअप, हेअर स्पा, हेअर प्रॉब्लेम याबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. 

चर्चासत्रात सहभागी झालेल्या महिलांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही तावरे यांनी दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून चारशेपेक्षा अधिक महिलांनी या वेबसेमिनारमधे सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी नगरसेविका वैशाली राजेंद्र मराठे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे या उपक्रमात सहभागी झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सकाळ’मार्फत गेली अनेक वर्षे न चुकता वृत्तपत्र विक्रेता महिलांसाठी महिला दिन साजरा केला जात आहे. कोरोनाच्या काळातही स्वतःची काळजी घेऊन आपला व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने वृत्तपत्र महिला विक्रेत्यांसाठी हा सन्मान नक्कीच प्रेरणादायी आहे.
- वैशाली मराठे, नगरसेविका 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने आपल्या महिला दिन सन्मानाच्या परंपरेत खंड पडू दिला नाही, याचा विशेष आनंद आहे. महिला म्हणून वृत्तपत्र विक्री व्यवसाय करताना घेत असलेल्या श्रमाचा आदर आणि सन्मान करणे हे अध्यक्ष म्हणून आपले  कर्तव्य आहे .
- विजय पारगे, अध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ

अंगणवाडी सेविकेमुळे महिलेला सासरच्यांकडून परत मिळाले बाळ; जुन्नरमधील घटना

आज कोणत्याच क्षेत्रात महिला मागे नाहीत, हे नव्याने सांगण्याची गरज नाही; परंतु भल्या पहाटे उठून वृत्तपत्र विक्री करणाऱ्या या भगिनींसाठी माझे कौशल्य असलेल्या फील्डचे नॉलेज शेअर करून अतिशय आनंद होत आहे.
- पल्लवी तावरे, ब्युटीशियन

Edited By - Prashant Patil