Sakal Impact : किरकटवाडी-नांदोशी रस्त्याचे काम अखेर सुरू; मोठा फौजफाटा तैनात 

Work on Kirkatwadi-Nandoshi road finally started
Work on Kirkatwadi-Nandoshi road finally started

धायरी : स्थानिकांचा विरोध, न्यायालयिन प्रक्रिया, प्रशासनातील समन्वयाचा अभाव असे अनेक अडथळे पार करत किरकटवाडी-नांदोशी रस्त्याचे काम अखेर मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू झाले आहे. रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांच्या गैरसोयीबाबत 'सकाळ' मधून वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. 3 जानेवारी 2019 रोजी या रस्त्याचे काम सुरू झाले होते. पीएमआरडीएच्या माध्यमातून या कामासाठी सुमारे 3 कोटी 16 लाख रुपये निधी मंजूर करण्यात होता. अनेक वर्षे या रस्त्याचे काम न झाल्याने रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली होती.

मराठ्यांनी घेतलेला पानिपतचा बदला

पीएमआरडीएच्या माध्यमातून काम सुरू झाल्याने किरकटवाडी, नांदोशी, सणसनगर या भागातील नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार होता, परंतु काही स्थानिकांनी कामाला विरोध करत कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे दोन वर्षांपेक्षा जास्त काळ काम थांबले होते. कोर्टाने वादग्रस्त ठिकाणी 7 मीटर रुंदीचा रस्ता करण्यास परवानगी दिल्याने अखेर पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे.स्थानिक काही व्यक्तींचा विरोध लक्षात घेऊन प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.

स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातले लक्ष
किरकटवाडी- नांदोशी रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करण्यापासून ते प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत खासदार सुप्रिया सुळे यांनी सतत प्रयत्न केले. सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून किरकटवाडी व नांदोशी येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन रखडलेले काम मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना तात्काळ पोलीस बंदोबस्त देण्याबाबत सुचित केले होते. 2 जानेवारी रोजी सर्व संबंधितांची एकत्रित आढावा बैठक पार पडली व कामाला सुरुवात झाली.

पुण्यात खरेदीसाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; डाळज येथे भीषण अपघातात 3 ठार

यावेळी जिल्हा परिषद उपअभियंता बाबुराव पवार,शाखा अभियंता शालिनी कोकाटे,
पीएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता पल्लवी सोनवणे, उपअभियंता राजेंद्र लोखंडे, शाखा अभियंता ज्ञानेश्वर आतकरे, पोलीस उपअधीक्षक राहुल आवारे, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते उपस्थित होते.

"अनेक दिवस या कामासाठी पाठपुरावा केला.नागरिकांची गैरसोय होत होती.परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार.प्रशासनाने आता कोणतेही काम शिल्लक न ठेवता रस्ता पूर्ण करावा."
- सागर हगवणे, ग्रा.पं.सदस्य,किरकटवाडी.

पुण्यात तरुणीची आत्महत्या; विदर्भातील मंत्र्यांशी अफेअरची चर्चा 

"जिल्हाधिकारी व पीएमआरडीए आयुक्त यांची दोन तारखेला बैठक झाली त्यावेळी वाहिवाटीचा सात मीटर रस्ता करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेमार्फत आम्हाला मार्किंग करून दिल्या नंतर आम्ही काम करण्यास सुरुवात केली."
- राजेंद्र लोखंडे, उपभियंता, पीएमआरडीए.

"2 तारखेला जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख , पीएमआरडीए आयुक्त डॉ सुहास दिवसे, पुणे ग्रामीण अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांची बैठक झाल्या नंतर 7 मीटर रस्ता करण्याचा वरिष्ठ जिल्हा न्यालय आदेशा नुसार रस्त्याचे आज काम सुरू झाले आहे."
- बाबुराव पवार, उपअभियंता, जिल्हा परिषद.
 

पुण्यात तरुणीची आत्महत्या; विदर्भातील मंत्र्यांशी अफेअरची चर्चा

"पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आदेश आल्यानंतर किरकीटवाडी-नांदोशी रखडलेल्या रस्त्याच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी हवेली पोलीस ठाण्यातुन व मुख्यालयाकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सहा अधिकारी व 30 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे."
- राहुल आवारे, पोलीस उपअधीक्षक, पुणे ग्रामीण. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com