जलजीवन मिशन '९० दिवस कार्यक्रम' यशस्वी करण्यासाठी मिशन मोडवर काम करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलजीवन मिशन '९० दिवस कार्यक्रम' यशस्वी करण्यासाठी मिशन मोडवर काम करा

जलजीवन मिशन '९० दिवस कार्यक्रम' यशस्वी करण्यासाठी मिशन मोडवर काम करा

पुणे : राज्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने जलजीवन मिशन उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेला '९० दिवस कार्यक्रम' हा यशस्वी करण्यासाठी मिशन मोडवर काम करा आणि यासाठी रेट्रोफिटिंग व नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा, असा आदेश या विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी दिला आहे.

हेही वाचा: चित्रा वाघ यांचा पत्ता कट, विधानपरिषदेसाठी बावनकुळेंना संधी!

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापुर व कोल्हापुर या पाच जिल्ह्यातील जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जयस्वाल यांनी शुक्रवारी (ता.१९) पुण्यात आयोजित केली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त सी.डी. जोशी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे, कार्यकारी अभियंता अमित आडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: रोहित-द्रविड पर्वात टीम इंडियाने जिंकली पहिली मालिका

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, विभागातील पाच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भू-वैज्ञानिक उपस्थित होते.

loading image
go to top