Corona Virus : कामगारांअभावी पेट्रोल पंपाचे काम थंडावले अन्..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पेट्रोल पंप व्यवसायिकांना अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांना, आजारपणासाठी उपचार घेण्यासाठी जाणाऱ्यांना, अत्यावश्यक वस्तू व सेवा 'या' क्षेत्रात काम करणाऱ्या खाजगी व्यक्ती आदींना पेट्रोल-डिझेल देण्यास संमती दिली आहे.  मात्र, तरीही यापैकी कोणतेही कारण नसताना नागरिक पेट्रोल पंपांवर गर्दी करीत असल्याचे चित्र गुरुवारी आकुर्डी येथील पेट्रोल पंपावर पहायला मिळाले

पिंपरी : शहरातील पेट्रोल पंपांवर काम करणारे काही कामगार कोरोनाच्या भीतीमुळे गावी गेले आहेत. त्यामुळे कामगारांअभावी काही पेट्रोल पंप कमी क्षमतेने तर काही गुरुवारी पूर्ण बंद होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पेट्रोल पंप व्यवसायिकांना अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांना, आजारपणासाठी उपचार घेण्यासाठी जाणाऱ्यांना, अत्यावश्यक वस्तू व सेवा 'या' क्षेत्रात काम करणाऱ्या खाजगी व्यक्ती आदींना पेट्रोल-डिझेल देण्यास संमती दिली आहे.  मात्र, तरीही यापैकी कोणतेही कारण नसताना नागरिक पेट्रोल पंपांवर गर्दी करीत असल्याचे चित्र गुरुवारी आकुर्डी येथील पेट्रोल पंपावर पहायला मिळाले. त्यामुळे संबंधित कामगार आणि नागरिकांमध्ये जोरदार वादावादी झाली.  

coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास
एका राजकीय पुढाऱ्याच्या कार्यकर्त्याने या पेट्रोल पंपावर जनरेटरसाठी डिझेल मागितले. त्यावर कार्यकर्त्यास तुमच्या नेत्याच्या लेटरहेडवर जनरेटरसाठी डिझेल हवे आहे ,असे लिहून आणा,असे संबंधित पंप मालकाने त्याला सांगितले. त्यानंतर तो कार्यकर्ता निघून गेला.

त्यांनी"जपली माणुसकी; लॉक डाऊन मध्येही जेवणाची सोय
काहीजण पेट्रोल मिळावे म्हणून वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे घेऊन आले होते. दुसरीकडे चिंचवड येथील एका पंपावर एकाच बाजूने प्रवेश देण्यात येत होता. कामगारांची अपुरी संख्या आणि गर्दी टाळणे असे या मागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले. 

Corona Virus : कोरोना आपत्ती निवारणासाठी राजपत्रित अधिकार्‍यांकडून दोन दिवसाचे वेतन

मोरवाडी येथील पंपचालक सचिन नावंदर यांनी सांगितले, '' टँकरमध्ये पेट्रोल, डिझेल आणण्यासाठी पंपावर टँकर उभा आहे. टँकरचालक मोशी येथे राहतो. तेथून त्याला मोरवाडी येथे येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नाही. त्यामुळे इच्छा असूनही मला टँकर भरून आणता येत नाही."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of petrol pumps was stopped Due to lack of workers