डेक्कन परिसरातील पदपथांच्या कामाची चौकशी करावी : निलेश निकम 

समाधान काटे
Friday, 4 December 2020

डेक्कन परिसरात गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता येथे पदपथाचे काम सुरू आहे. यामध्ये पाईपलाईन, पेवर ब्लॅक, सिमेंट काँक्रिटीकरण करणे अशी कामे सुरू आहेत. हे सुरू असलेलं काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार निलेश प्रकाश निकम यांनी पुणे महापालिका पथ विभाग यांच्याकडे केली आहे.

गोखलेनगर : डेक्कन परिसरात गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता येथे पदपथाचे काम सुरू आहे. यामध्ये पाईपलाईन, पेवर ब्लॅक, सिमेंट काँक्रिटीकरण करणे अशी कामे सुरू आहेत. हे सुरू असलेलं काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार निलेश प्रकाश निकम यांनी पुणे महापालिका पथ विभाग यांच्याकडे केली आहे.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

दरम्यान, ५ एमएम स्टील असलेले एल शेप करणे अपेक्षित असताना स्टिल नसलेले एल शेप साहित्य वापरले आहे. आरसीसी पाईप १२ इंच फुटलेले बसवले आहेत. यासह झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे.

खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कचऱ्याचे ढीग; व्यावसायिकांकडून होतेय विद्रुपीकरण

बसवलेले ब्लॅक हलत असून काही ठिकाणचे कॉंक्रिटीकरण उखडलेले आहे. एल शेप करब स्टोन लेवल मध्ये बसवले नाहीत.ठेकेदार अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचा आरोप करून सदरील कामाची चौकशी करावी आसे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मी पुणे महानगरपालिका मुख्य अभियंता पद विभाग यांच्याकडे पुराव्यासहित लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. सदर संपूर्ण कामाची आय.आय.टी चेन्नई  यांच्यामार्फत ऑडिट करण्यात यावे तसेच सदर ठेकेदारावर पुणे महानगरपालिकेच्या नियमानुसार योग्य ती कडक  कारवाई करण्यात यावी . इतकं निकृष्ट दर्जाचे काम चालू असताना सुद्धा पुणे महानगरपालिकेचे अधिकारी  ठेकेदाराला पाठीशी का घालतात? कदाचित पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे ठेकेदारा  संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे शक्यता नाकारता येत नाही. -निलेश प्रकाश निकम, अध्यक्ष म्हाळूपार्वती प्रतिष्ठान 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पत्र माझ्याकडे आलेले नाही. पत्र आले की पाहून घेतो. -विजय कुलकर्णी मुख्य अभियंता पथ विभाग, पुणे महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on sidewalks in Deccan area should be investigated says nilesh nikam